Pre-School Preparation Out of School Student sakal
पुणे

शिक्षणापासून दूरावलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘शाळा पूर्व तयारी’

गेल्या दोन वर्षात शिक्षणापासून दुरावलेल्या शाळाबाह्य बालकांना शाळेत दाखल करून घेण्याच्या प्रक्रियेला गती

मीनाक्षी गुरव - सकाळ वृत्तसेवा

पुणे : गेल्या दोन वर्षात शिक्षणाच्या प्रवाहापासून दुरावलेल्या शाळाबाह्य बालकांना शाळेत दाखल करून घेण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे. जिल्ह्यामध्ये त्या-त्या शाळांमधील शिक्षकांमार्फत परिसरातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करून घेण्यात येत असून या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा उत्सव शाळा सुरू होण्यापूर्वीच होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षात अंगणवाड्या, बालवाड्या बंद असल्याने बालकांना शाळा पूर्व तयारी फारशी करता आलेली नाही. त्यामुळे पालकांची अपेक्षित शाळा पूर्व तयारी व्हावी, त्याआधारे दाखल पात्र बालकांचा शाळा प्रवेश व्हावा, यासाठी राज्य ते शाळा स्तरावर शाळा पूर्व तयारी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शाळा स्तरावरील प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांमार्फत संबंधित पालकांशी संपर्क केला जात असून शाळाबाह्य बालकांचा शाळा प्रवेश करून घेण्यात येत आहे. दरम्यान, बालकांना शाळेची आणि ओघाने शिक्षणाची गोडी लागावी,यासाठी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आकर्षक सजावट, विद्यार्थ्यांचे औक्षण, खाऊचे वाटप असे आकर्षक उपक्रम राबविण्यात येत आहेत.

अशी होणार शाळा पूर्व तयारी :

१. शाळाबाह्य बालकांचा शाळा प्रवेश (शाळेत दाखल करून घेणे)

२. त्यानंतर विद्यार्थ्यांचे वजन, उंची मोजणे

३. विशेष पुस्तिकेमार्फत आवश्यक ज्ञान देणे

४. वयानुसार विविध क्षमता विकसित झाल्या आहेत की नाही हे पाहणे

५. विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक/भावनिक, सामाजिक विकास झाला आहे की नाही हे पाहणे

‘‘अंगणवाड्यांमधील सेविका आणि शिक्षकांच्या मदतीने शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात येत आहे. शिक्षकांमार्फत शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. शाळेमध्ये दाखल करण्यास पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या विद्यार्थ्यांना शाळेची, शिक्षणाची ओढ लागावी, यासाठी प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना त्या-त्या शाळेत बोलावून त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. शाळेची पूर्व तयारी म्हणून विविध उपक्रम राबवून या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा केला जात आहे.’’

- राजेंद्र जगताप, शिक्षक नेते, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ

‘‘गेल्या दोन वर्षापासून शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर असणाऱ्या विद्यार्थ्यांचा शिक्षकांमार्फत शाळा प्रवेश करवून घेण्यात येत आहे. प्रत्यक्षात जूनमध्ये शाळा सुरू होणार असल्या तरी, शाळेत प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना एप्रिलमध्ये शाळेत बोलावून त्याचे स्वागत केले जात आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाशी, शाळेतील वातावरणाशी जुळवून घेता यावे, यासाठी शाळांमध्ये विविध आकर्षक उपक्रम राबविण्यात येत आहेत.’’

- महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ते, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

SCROLL FOR NEXT