पुणे

मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

CD

गर्भावस्थेमुळे नोकरी
नाकारणे बेकायदेशीर
------
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा केंद्र सरकारला दणका
---
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. ९ : गर्भवती असणे हा कोणताही आजार नाही, त्यामुळे केवळ गरोदरपणाचे कारण पुढे करून एखाद्या महिलेची नियुक्ती रोखणे हे तिच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.
न्यायालयाने केंद्र सरकारचा यासंदर्भातील आदेश रद्द ठरवत याचिकाकर्त्या महिला डॉक्टरला कामावर रुजू करून घेण्याचे आदेश दिले आहेत. याचिकाकर्त्यांना कामावर रुजू करून घेण्यापूर्वी सीआरपीएफ ‘डीआयजी’ यांच्या ‘फिटनेस सर्टिफिकेट’च्या अधीन राहूनच त्यांना नियुक्ती दिली जाणार आहे. याचिकाकर्त्यांना १९५९ च्या गृह मंत्रालयाच्या नियमावलीनुसार ज्येष्ठतेचे सर्व लाभ दिले जातील. यामुळे त्यांना पूर्वलक्षी प्रभावाने नियुक्ती मिळण्याचे आणि त्या अनुषंगाने मिळणाऱ्या सेवाविषयक लाभांचा मार्ग मोकळा झाला आहे.
-
नेमके प्रकरण काय?
याचिकाकर्त्या डॉ. रेणुका शिवाजी बुणगे यांची केंद्रीय राखीव पोलिस दलात (सीआरपीएफ) ‘स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर’ (ग्रेड-२) या पदावर निवड झाली होती. ८ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांना नियुक्तीपत्र मिळाले आणि त्या कर्तव्यावर हजर होण्यासाठी गेल्या. मात्र, वैद्यकीय तपासणीत त्या १६ आठवड्यांच्या गर्भवती असल्याचे आढळले. ‘स्वामीज मॅन्युअल’मधील नियमांचा हवाला देत, ‘सीआरपीएफ’ने त्यांना ‘तात्पुरते अनफिट’ ठरवले आणि त्यांची नियुक्ती स्थगित ठेवली. या अन्यायाविरुद्ध डॉ. रेणुका यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मुंबईत मुसळधार पावसाचा कहर, अनेक भागांत २०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद

Tukaram Mundhe Crackdown : मुंढेंच्या दणक्याने हॉटेल्सही 'सरळ'! आधी सिलिंडर, आता 'एफडीए'मुळे मेन्यूमध्ये कपात; पनीर, चीज, खवा 'गायब'च

Koyna Rain: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार; ५० मिमीहून अधिक पावसाची नोंद

Fifa World Cup 2026 : घानाचा 'घाला'! तगड्या इंग्लंडला रडवले; २८ वर्ष, दुसरा सामना अन् परंपरा कायम, L गटात खतरनाक चुरस

Success Story: सामान्य कुटुंबातून असामान्य यश! यशवंत जगतापांची प्रेरणादायी कामगिरी; सरकारी भरती परीक्षांत यशाचा धडाका

SCROLL FOR NEXT