Pregnant-women 
पुणे

Coronavirus : गर्भवती महिलांना कोरोनाची धास्ती 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - आई होणं हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण. मात्र, कोरोनाच्या दहशतीमुळे चक्क गर्भवती महिलांनी नियमित तपासण्या बंद केल्याचे समोर आले आहे. संसर्गाच्या भीतीपोटी शासकीय व खासगी रुग्णालयात बाळाच्या तपासणीसाठी येणाऱ्या गर्भवती महिलांचे प्रमाण पन्नास टक्क्यांहून अधिक घटल्याचे समोर आले आहे. 

यशवंतराव चव्हाण रूग्णालयात स्त्री रोग व प्रसूती विभागात दररोज उपचारासाठी येणाऱ्या 80 ते 90 महिला असतात. रुग्णालयात पाऊल ठेवायला जागा उरत नाही. डॉक्टरही कमी पडतात. सध्य स्थितीत अवघ्या 25 ते 30 महिला सोनोग्राफी व तपासणीसाठी येत आहेत. खासगी दवाखाने देखील कमी वेळ सुरू असल्याने व काही बंद असल्याने महिला पेचात सापडल्या आहेत.

ज्या महिलांचे गर्भधारणेचे आठ महिने उलटले आहेत अशा महिलांची मानसिकता संसर्गजन्य परिस्थितीमुळे खालावली आहे. तिसऱ्या महिन्यापासून विविध तपासण्यासाठी महिलांनी अद्यापपर्यंत घर सोडले नाही. काही जण फोनवरूनच विचारणा करत आहेत. बाळाच्या वाढीसाठी हृदयाचे ठोके व नाडी तपासणी चौथ्या महिन्यात केली जाते. मात्र, महिलांनी या तपासणीकडेही पाठ फिरवली आहे. 

ही घ्या काळजी..
गर्भवती व नवजात शिशु मातांनी आवश्यक तपासणीसाठीच घर सोडणे आवश्यक आहे. दोन ते तीन आठवड्यामध्ये करण्यात येणाऱ्या तपासण्या चार ते पाच आठवड्याने कराव्यात. सर्दी, ताप, खोकला असल्यास तत्काळ शासकीय रुग्णालयात संपर्क साधावा. घरात योगा, प्राणायाम व योग्य तेवढी झोप आवश्यक आहे. चौरस आहार  गरजेचा आहे. बाहेरील संपर्क टाळणे अत्यावश्यक आहे. तितकीच स्वच्छता महत्वाची. सोळा आठवड्यानंतर बालकाच्या हालचालीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. 

सोनोग्राफी सेंटर व खासगी दवाखाने कमी वेळ सुरू  काही खासगी दवाखान्यासह सोनोग्राफी सेंटर कमी वेळ सुरू असल्याने महिला चिंतेत आहेत. वेळप्रसंगी कुठे धाव घेणार असा प्रश्न महिलांसमोर उभा आहे.

वायसीएम रुग्णालय सोडून लवकरच स्वतंत्र कक्ष सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. कोरोनामुळे महिला घाबरल्या आहेत त्यामुळे उपचारासाठी येत नाहीत. पण हे घातक आहे. 31 मार्च नंतर ठोस निर्णय होणे अपेक्षित आहे. आम्ही मातांचे समुपदेशन ही करत आहोत.
- डॉ. महेश असलकर, स्त्रीरोग तज्ज्ञ, वायसीएम रुग्णालय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: कोकणात जन्म; अनेक पदे भुषवली, पण स्वातंत्र्य लढ्यातील वक्तव्यानं अनभिषिक्त...; ठाकरेंनी उल्लेख केलेले स.का.पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT