aarti.jpg 
पुणे

आरोग्य विभागातील स्वच्छतादूतांकडून पूरग्रस्तांची सेवा 

आरती मेस्त्री


पुणे ः  मोबाईल टॉयलेट स्वच्छता, औषध फवारणी, पिण्याचे पाणी पुरवणे, शाळा परिसराची दैनंदिन स्वच्छता करण्याबरोबरच पूरग्रस्तांच्या दिमतीला अहोरात्र उपस्थित राहण्याचे कार्य पार पाडले आहे घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागातील स्वच्छतादूतांनी. वाकडेवाडी भागातील नदीकाठच्या पूरस्थितीत अडकलेल्या नागरिकांनी घरी परतत असताना त्यांच्याप्रती नुकतीच कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे. 

पूरस्थितीत अडकलेल्या नागरिकांना पीएमसी कॉलनीतील महापालिकेच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आले होते. अशा परिस्थितीत नागरिकांना राहण्यासाठी विभागाकडून प्रथम शाळेतील वर्ग रिकामे करून स्वच्छ करण्यात आले होते. त्यानंतर बाधित नागरिकांना या वर्गांमध्ये हलवण्यात आले. त्या ठिकाणी पिण्याचे पाण्याच्या टॅंकरची सोय करण्यात आली होती. तसेच मोबाईल टॉयलेट, औषध फवारणी, दवाखान्याची मोबाईल व्हॅन आदी आरोग्य सुविधा देण्यात आल्या होत्या. दैनंदिन स्वच्छतेसाठी विभागाच्या स्वच्छता दूतांची तीन पाळींमध्ये नेमणूक करण्यात आली होती. शाळांमध्ये सुमारे 203 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले होते. अंदाजे 971 नागरिकांची चार ते पाच दिवस आरोग्य विभागाकडून काळजी घेतली गेल्याने पाटील इस्टेटच्या नागरिकांनी समाधान व्यक्त केल्याची माहिती वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सुनील कांबळे यांनी दिली. राजेंद्र आल्हाट, प्रमोद चव्हाण, जयवंत केंजळे, कडाबाई दुबळे, विद्या बनसोडे, मयूर रंधवे यांच्यासह अन्य स्वच्छता दूतांनी पूरग्रस्तांना अहोरात्र सेवा पुरवण्यात पुढाकार घेतला होता. 

पूरग्रस्त नागरिकांच्या प्रतिक्रिया 
 

सिंधूताई शिरसाट ः अनेक सामाजिक संस्थांकडून जेवण-नाश्‍त्याची सोय होत होती. मात्र वाटप होताना अनेक ठिकाणी अन्न जमिनीवर सांडत होते. तसेच जेवणाच्या पत्रावळी, पाण्याचे ग्लास अस्ताव्यस्त पडलेले असत, मात्र स्वच्छता दूतांकडून वेळोवेळी सफाई होत असल्याने नागरिकांना शाळेत दिवस-रात्र काढणे सोयीचे गेले. 

पूजा कुचेकर ः घरात पाणी शिरल्याने पोराबाळांसह पीएमसी कॉलनीच्या शाळेत सहा दिवस काढले. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आमची चांगली काळजी घेतली. 

विलास शिरसाट ः एकाच खोलीत 25- 30 माणसे असल्याने रात्री डोळ्याला डोळा लागत नव्हता. मात्र महापालिकेच्या आरोग्य विभागाने चांगल्या सुविधा पुरविल्या. पिण्याचे पाणी, आरोग्य तपासणी नियमित होत असल्याने आम्हाला काही आजार झाला नाही. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT