school
school 
पुणे

शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षण विभागाकडून तयारी; स्थानिक प्रशासनाला सूचना

सकाळन्यूजनेटवर्क

पुणे- राज्यातील शाळा येत्या सोमवारपासून सुरू करण्याची तयारी सध्या सुरू आहे. शाळा सुरू करण्यापूर्वीची तयारी म्हणून शालेय शिक्षण विभागाने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्या संदर्भात स्थानिक प्रशासनाला सूचनाही देण्यात येत आहेत.

राज्यातील शाळांमध्ये इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग येत्या सोमवारपासून सुरू होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्यापूर्वी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या असून त्यानुसार स्थानिक महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने व्यवस्था करावी, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी दिल्या आहेत.

देवी-देवतांचा अवमान करणाऱ्या ऍमेझॉन कंपनीला महाराष्ट्र व संपूर्ण भारतात बंदी...

शाळा सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारने काढलेले परिपत्रक आणि मार्गदर्शक सूचनांनुसार स्थानिक प्रशासनाने शाळा, शिक्षक यांना आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात, असे त्यांनी राज्यातील सर्व महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालये यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. शाळांना सँनिटायझर, थर्मल गन, ऑक्सीमीटर अशा आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात स्थानिक प्रशासनाने सहकार्य करावे. तसेच येत्या रविवारपर्यंत (ता.२२) संबंधित शिक्षकांना शासकीय केंद्रात कोविड-१९ साठी आरटीपीसीआर टेस्टिंग मोफत वैद्यकिय तपासणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी, असे कृष्णा यांनी नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरमधून हेमंत सावरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT