Droupadi Murmu Pune Potholes 
पुणे

Murmu about Pune : 'मोदींच्या दौऱ्यापूर्वी तरी...' पुण्यातल्या खड्ड्यांवरुन राष्ट्रपती वैतागल्या; खरमरीत पत्र लिहून व्यक्त केली नाराजी

Droupadi Murmu: राष्ट्रपतींनी पुणे पोलिसांना खरमरीत पत्र लिहून खड्ड्यांवरुन नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, असं एक पत्र पुणे पोलिसांनी महानगर पालिकेला लिहिलं आहे. शहरातील खड्डे ही समस्या जीवघेणी झाली आहे. तरीही मनपाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय.

संतोष कानडे

Potholes on roads: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या दोन दिवस पुण्याच्या दौऱ्यावर होत्या. दौऱ्यादरम्यान त्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे वैतागून त्यांनी पुणे पोलिसांना पत्र लिहिल्याची माहिती आहे.

पावसाळ्यात शहरातील रस्त्यांना खड्डे पडून चाळण झालेली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडून वाहनचालक त्रस्त झाले आहेत. गणेश खिंड रस्त्यावर शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो आणि उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. या ठिकाणी खड्डे पडून वाहतूक कोंडी होत असल्याने महापालिका, पीएमआरडीए, वाहतूक पोलिस यांच्या संयुक्त बैठका झाल्या, उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात आले. तरीही रस्त्याची स्थिती सुधारलेली नाही.

देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या २ आणि ३ सप्टेंबर रोजी पुण्याच्या दौऱ्यावर होत्या. दौऱ्यादरम्यान त्या राजभवन येथे मुक्कामी होत्या. याशिवाय शहरातील काही ठिकाणी कार्यक्रमांसाठी त्यांनी हजेरी लावली होती. त्यादरम्यान त्यांच्या ताफ्यातील गाड्यांना खड्ड्यांचा सामना करावा लागला.

राष्ट्रपतींनी पुणे पोलिसांना खरमरीत पत्र लिहून खड्ड्यांवरुन नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, असं एक पत्र पुणे पोलिसांनी महानगर पालिकेला लिहिलं आहे. 'एबीपी माझा'ने हे वृत्त दिले आहे.

पुणे शहरातील खड्ड्यांची समस्या जीवघेणी झाली आहे. तरीही मनपाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय. शहरात दररोज छोटे-मोठे अपघात होत आहे. नागरिकांची जीव जाण्याची वाट पालिका बघतेय का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

  • २६ ऑगस्टपासून बुजविलेले खड्डे - ४३२

  • वापरण्यात आलेले डांबर - १३३४ मेट्रीक टन

  • एकूण क्षेत्रफळ - १९८१ चौरस मीटर

  • चेंबरची दुरुस्ती - ३६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Miracle: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

भाजीत मीठ कमी का? पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत छतावरून खाली दिलं फेकून; 5 महिन्यांच्या गर्भवतीचा दुर्दैवी अंत

धक्कादायक! भाजपचे आमदारांने महिलांचे केले शोषण; तृप्ती देसाईंचा गंभीर आराेप, मुख्यमंत्र्यांकडे केली राजीनाम्याची मागणी

Pralhad Joshi: इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, दर वाढविण्यासाठी प्रयत्न : प्रल्हाद जोशी

SCROLL FOR NEXT