Ajit Pawar : sakal
पुणे

Ajit Pawar : पिंपरी-चिंचवडचा अध्यक्ष रविवारी ठरणार;मेळाव्यात अजित पवार प्रमुख पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद

पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह त्यांच्या समर्थक १५ माजी नगरसेवकांनी व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे सर्किट हाऊस येथे बैठक घेतली.

राजेंद्र पाटील - सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह त्यांच्या समर्थक १५ माजी नगरसेवकांनी व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे सर्किट हाऊस येथे बैठक घेतली. यात काळेवाडीतील रागा पॅलेस हॉल येथे रविवारी (ता. २१) मेळावा घेऊन नवीन शहराध्यक्ष जाहीर करणार असल्याचे पवार यांनी बैठकीत सांगितले.

पुण्यातील बैठकीला आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी महपौर योगेश बहल, मंगला कदम, अपर्णा डोके, ज्येष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, जगदीश शेट्टी, श्याम लांडे, नारायण बहिरवाडे, शमिम पठाण, महंमद पानसरे, अतुल शितोळे, मोरेश्‍वर भोंडवे, प्रसाद शेट्टी, काळूराम पवार, माया बारणे आदी उपस्थित होते.

यावेळी सुमारे ५० माजी नगरसेवक व पक्षाच्या विविध विभागांचे अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते. यासह पक्षाचे विविध विभागांचे शहराध्यक्ष व प्रमुख पदाधिकारीही उपस्थित होते. काळेवाडी येथे होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्याची जबाबदारी अजित पवार यांनी विलास लांडे यांच्यावर टाकल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे.

यावेळी पवार म्हणाले, ‘‘अजित गव्हाणे यांना मी समजावून सांगितले. त्यांना निवडणूक लढवायची असल्याने ते गेले. अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाबरोबरच आहेत. तुम्ही मला शहराध्यक्षपदासाठी ५-६ नावे द्या, येत्या २१ जुलैला मी मेळाव्यात नाव जाहीर करतो.’’

दिग्गज शर्यतीत...

पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदासाठी माजी महापौर योगेश बहल, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष जगदीश शेट्टी, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, श्याम लांडे, सतीश दरेकर आदींच्या नावाची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

रात्रभर नोटा जाळत होता सरकारी इंजिनिअर तरी पैसे शिल्लक, छाप्यात सापडलं मोठं घबाड; कोट्यवधींच्या राखेसह रोकड जप्त

Pune Elections 2025 : पुणे महापालिकेची नवी प्रभागरचना जाहीर; ४० प्रभाग चार सदस्यांचे, एक प्रभाग पाच सदस्यांचा

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

SCROLL FOR NEXT