Crime
Crime 
पुणे

कामगारांना पैसे द्यावे लागू नयेत, म्हणून ठेकेदारानेच केला लुटल्याचा बनाव 

सकाळवृत्तसेवा

पुणे - कामगारांना देण्यासाठी ठेवलेले पैसे खर्च झाल्याने, तसेच कामगारांना काय उत्तर द्यावे, म्हणून ठेकेदाराने त्याला हांडेवाडी येथे लुटल्याचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या सर्व प्रकरणाची कोंढवा पोलिसांनी कसून चौकशी करीत त्याच्याविरुद्ध खोटी फिर्याद दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भाऊसाहेब लाला वाळुंजकर असे गुन्हा दाखल झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. वाळुंजकर 20 डिसेंबर रोजी हांडेवाडी रस्त्यावरून जात असताना दुचाकीवरून आलेल्या व्यक्तींनी त्यांना अडविले. त्यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याजवळील दोन लाख 70 हजार रूपयांची रोकड लुटल्याची तक्रार कोंढवा पोलिसांकडे दिली होती. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जबरी चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू केला. वाळुंजकर यांच्याकडे आरोपींबाबत चौकशी केली. त्यावेळी त्यांनी सांगितलेल्या वर्णनावरून आरोपीचा शोध घेतला जात होता.

दोन्ही आरोपींनी हेल्मेट घातल्याचे असल्याचे वाळुंजकर हे सांगत होते. त्यानुसार पोलिसांनी परिसरातील 20 ते 25 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्याची पाहणी केली. त्यावेळी त्या सीसीटीव्हीत फक्त वाळुंजकर हेच दुचाकीवरून जाताना दिसत होते. पण, त्यांनी वर्णन सांगितलेले आरोपी कोणत्याही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत नव्हते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यामुळे पोलिसांना त्यांच्यावरच संशय आला. त्यांना बोलवून चौकशी केली. त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करून विचारणा केली, त्यावेळी त्यांनी बनाव रचल्याचे सांगितले. ठेकेदारास पोलिसी खाक्‍या दाखविताच त्याने खोटी फिर्याद दिल्याचे सांगितले. आठवड्याला कामागाराच्या पगारासाठी त्यांना त्यांचा ठेकादार पैसे देत असतो. पण, यावेळी दिलेले पैसे खर्च झाले. त्यामुळे खोटी फिर्याद दिल्याची कबुली दिली होती, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक सरदार पाटील यांनी दिली.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket Team : जिंकलेत आयर्लंडविरूद्ध अन् म्हणे पाकिस्तान जगातील सर्वोत्तम संघ... PCB च्या नक्वींनी कळसच गाठला

Pune Traffic : मेट्रोच्या कामामुळे सिमला ऑफिस चौकाजवळ वाहतुकीत बदल

PM Modi Mumbai roadshow : ''जुने रेकॉर्ड तोडणार'' मोदींच्या मुंबईतील 'रोड शो'ला तुफान प्रतिसाद; पंतप्रधान म्हणाले...

IPL 2024 RR vs PBKS Live Score: आवेशने एकाच ओव्हरमध्ये पंजाबला दिले दुहेरी धक्के! धोकादायक रुसो पाठोपाठ शशांक सिंगही परतला माघारी

Pune Crime News : महादेव ॲपद्वारे ऑनलाइन सट्टा चालविणाऱ्या कॉल सेंटरवर छापा

SCROLL FOR NEXT