पुणे

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी जनजागृती हवी

CD

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी जनजागृती हवी
न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे : नान्नज येथे कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ३० : मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षाच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांमध्ये कायदेविषयक जनजागृती निर्माण करण्याबरोबरच वन्यजीवांचे संरक्षण, तसेच संघर्षग्रस्त नागरिकांसाठी शासनाच्या उपलब्ध योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथे मानव व वन्यजीव संघर्षाबाबत जनजागृती कार्यशाळा झाली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्याची व उपलब्ध विधी सेवांबाबत युवा विधिज्ञ चैतन्य केंगार यांनी माहिती दिली. वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्षाबाबत वन विभागाची भूमिका व विविध उपाययोजनांची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रोहितकुमार गांगर्डे यांनी दिली.
न्यायाधीश देशपांडे यांनी वन्यजीवांच्या अधिवासाचे संरक्षण, नागरिकांनी घ्यावयाची दक्षता, वन्यजीवांशी संघर्ष झाल्यास उपलब्ध कायदेशीर मदत तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले. नागरिकांनी वन्यजीवांशी संबंधित समस्या, कायदेशीर तरतुदी आणि उपलब्ध मदतीबाबत विविध प्रश्न विचारले. नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. कार्यक्रमास स्थानिक नागरिक व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: टायगर श्रॉफवर गोळीबार; दुचाकीवरून आले तीन हल्लेखोर,धक्कादायक व्हिडिओ समोर

‘मतचोरी’चा आरोप करूनही माझ्यावर मानहानीचा खटला नाही, कारण...; राहुल गांधींचा मोठा दावा!

Latest Marathi News Live Update : Tiger Shroff Firing Live : टायगर श्रॉफवरील गोळीबाराची मुख्यमंत्र्यांकडून दखल; पोलीस आयुक्तांशी चर्चा करत कठोर कारवाईचे आदेश

Yavatmal News: सोयाबीनने ओलांडला साडेसहा हजारांचा टप्पा; अत्यल्प पावसामुळे घटले उत्पादन, बाजारात आवक कमी

Leopard Attack: नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; सर्वांसमोर नेले उचलून, चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरुन महाकालीच्या दर्शनासाठी निघाले अन्..

SCROLL FOR NEXT