पुणे

बसथांब्यांजवळील अवैध वाहतूक रोखणार 

सकाळवृत्तसेवा

पुणे - पीएमपीच्या बसथांब्यांजवळ होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी पीएमपी आणि वाहतूक पोलिसांचे संयुक्त पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकाने रविवारपासून कारवाईस सुरवात केली. 

शहरातील प्रमुख बसथांब्यांजवळून अवैध प्रवासी वाहतूक होते. त्याबाबत कारवाई करण्यासाठी पीएमपीकडून वारंवार वाहतूक पोलिसांना विनंती केली जाते. या पार्श्‍वभूमीवर वाहतूक उपायुक्त पंकज देशमुख, पीएमपीचे बीआरटी व्यवस्थापक अनंत वाघमारे आणि अन्य अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत एक पोलिस उपनिरीक्षक आणि दोन कर्मचारी पीएमपीच्या पथकासाठी देण्याचा निर्णय देशमुख यांनी घेतला. याबाबत कारवाई करण्यासाठी पीएमपीने एक अधिकारी आणि एक कर्मचारी नियुक्त केला. संपूर्ण शहरात पीएमपीचे पथक कारवाई करणार असून, आज सकाळी कात्रज स्थानकावर दोन रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 

जादा बसथांबे काढणार 
शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये काही रस्त्यांवर जादा बसथांबे उभारले गेले आहेत. ते काढून टाकण्याची सूचना वाहतूक पोलिसांनी केली आहे. त्यानुसार येत्या आठ दिवसांत पाहणी करून जादा; परंतु वापरात नसलेले बसथांबे काढण्यात येणार असल्याचे पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार शनिवारी पाटील प्लाझाजवळील दोन बसथांबे काढण्यात आले आहेत. 

पीएमपीकडून 26 टाइम किपरच्या बदल्या 
पीएमपीमध्ये वाहक-चालकांच्या कामाच्या वेळा निश्‍चित करणाऱ्या 26 टाइम किपरच्या तब्बल तीन वर्षांनी बदल्या शनिवारी करण्यात आल्या. वाहक-चालकांना वेळा देताना पैसे घेतले जातात, अशा प्रकारच्या तक्रारी होत होत्या. याची दखल घेऊन या बदल्या करण्यात आल्या. या बदल्या रद्द कराव्यात, यासाठी काही नगरसेवकांनी प्रयत्न केले होते; परंतु पीएमपी प्रशासन ठाम राहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT