previous recruitment process Canceled of pune Zilla Parishad New recruitment in January 
पुणे

पुणे जिल्हा परिषदेची याआधीची नोकर भरती प्रकिया रद्द

परीक्षा शुल्क परत देणार; येत्या जानेवारीत नव्याने भरती प्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्हा परिषदेतील क वर्गीय रिक्त पदांची भरती करण्यासाठी महाभरतीअंतर्गत याआधी मार्च २०१९ आणि आॅगस्ट २०२१ मध्ये राबविण्यात आलेली नोकर भरती प्रक्रिया राज्याच्या ग्रामविकास विभागाने शुक्रवारी (ता.२१) रद्द केली आहे. यामुळे या दोन्ही भरती प्रक्रियेत नोकरीसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत केले जाणार आहे. हे परीक्षा शुल्क जिल्हा परिषदेकडून परत देण्यात येणार असल्याचे राज्याच्या ग्रामविकास विभागाने जाहीर केले आहे. दरम्यान, या रिक्त पदांच्या भरतीसाठी येत्या जानेवारी महिन्यात नव्याने जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून स्थगित असलेली जिल्हा परिषद नोकर भरती करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

राज्याच्या ग्रामविकास विभागाने याबाबतचा आदेश जिल्हा परिषदांना दिला आहे. या आदेशाची प्रत शुक्रवारी पुणे जिल्हा परिषदेला मिळाली आहे. जिल्हा परिषदेतील क वर्ग संवर्गातील रिक्त पदांचा सुधारित आकृतिबंध तयार केला जाणार आहे. हा सुधारित आकृतिबंध मंजूर झाल्यानंतर नव्याने या रिक्त पदांच्या भरतीसाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. सुधारित आकृतिबंध मंजूर करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी निश्‍चित करून देण्यात आला आहे. दरम्यान, ही भरती प्रक्रिया आता पूर्वीप्रमाणे जिल्हा परिषद पातळीवरच राबविली जाणार आहे.

पूर्वी जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील रिक्त पदे ही दरवर्षी भरली जात असत. यासाठी जिल्हा परिषद स्तरावरच भरती प्रक्रिया राबविली जात असे. जिल्हा परिषदेत क संवर्गातील विविध प्रकारची १८ पदे आहेत. यापैकी आरोग्य विभागातील विविध पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. उर्वरित सर्व संवर्गातील क वर्गीय रिक्त पदे ही सुधारित आकृतिबंध मंजूर झाल्यानंतरच भरावीत, असे ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेला दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT