मंगळवेढ्यात आजपासून
हमीभाव केंद्राची सुरवात
मंगळवेढा : तालुका सहकारी खरेदी विक्री संघ व नॅशनल को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड तसेच महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन सोलापूर यांच्या वतीने शासकीय हमीभाव उडीद, सोयाबीन, मुग खरेदीचा शुभारंभ उद्यापासून होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पणन अधिकारी मनोज बाजपेई व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मंगळवेढा वाघमारे यांच्या शुभहस्ते व खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. शेतकऱ्यांनी आमच्या कार्यालयाकडून उडीद, सोयाबीन, मुग विक्री करण्यासाठी सोडण्यात आलेल्या एसएमएस प्राप्त झाल्यानंतर माल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर ती घेऊन यावा अशी विनंती संस्थेच्या वतीने श्री सिद्धेश्वर बबनराव अवताडे यांनी केली. शेतकरी बांधवांना खरेदी केंद्र संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास संस्थेचे व्यवस्थापक शंभू नागणे
९४०५२१४५९५ व खरेदी केंद्राचे केंद्रप्रमुख मच्छिंद्र कोंडूभैरी ९८९०८३१९३४ यांच्याशी संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.