Pomegranate esakal
पुणे

Pomegranate Price : आळेफाटा येथील मार्केटमध्ये डाळिंबाने खाल्ला भाव

२० किलोच्या एका पेटीला मिळाला उच्चांकी बाजार भाव

सकाळ वृत्तसेवा

- राजेश कणसे

आळेफाटा : बाजार समितीत मंगळवार दि.१९ रोजी डाळींबाच्या २० किलोच्या एका क्रेटला मिळाला १००११ रुपयांचा भाव मिळाला आहे. अशी माहिती सभापती संजय काळे,संचालक नबाजी गाडगे,सचिव रुपेश कवडे, व्यवस्थापक महाबरे यांनी दिली आहे.या हंगामातील डाळिंबास उच्चांकी बाजार भाव मिळाला आहे.

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत असणाऱ्या आळेफाटा येथील उपबाजारात कांद्या प्रमाणे आता डाळिंबाचे देखील लिलाव मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहेत. त्यात मंगळवारी झालेल्या बाजार लिलावात अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील शेतकरी विवेक अविनाश रायकर यांच्या डाळींबास वीस किलोच्या एका क्रेटला तब्बल १० हजार ०११ रुपयांचा भाव मिळाला आहे.

त्या खालोखाल त्याच्या दुसऱ्या डाळिंबाच्या एका क्रेटला ८ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला आहे.तर तिस-या क्रमांकाच्या डाळींबाच्या एका क्रेट ला ६ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला व तिस-या क्रमांकाच्या एका क्रेट ला ३ हजार रुपयांचा बाजारभाव मिळाला आहे.

दरम्यान येथील या बाजार समितीत पारनेर, संगमनेर, श्रीगोंदा, शिरूर, अहमदनगर या ठिकाणाहुन शेतकरी डाळिंब विक्रीसाठी येत असतात. त्यामुळे पुणे आणि नगर जिल्ह्यासाठी ही महत्त्वाची बाजार पेठ आहे.

या बाजार समितीत फळ लिलाव मोठ्या प्रमाणावर केले जातात. हे मार्केट कांदा लिलावासाठी प्रसिद्ध आहे, पण डाळिंबाला दिवसेंदिवस चांगला बाजारभाव मिळत असल्याने डाळींबासाठी ही बाजारपेठ आता चर्चेत येऊ लागली आहे.

अशी माहिती माहिती प्रवीन लेंडे,मनोज लेंडे,नारायण साबळे,निशीकांत ढोमसे नामदेव भुजबळ,संदीप कोरडे,विशाल कुटे,विजय कु-हाडे,संतोष कु-हाडे,प्रविण लेंडे,संदीप लोढा,पप्पु सरोदे,चारूदत्त साबळे,गणेश गडगे,गोविंद‌ गाडेकर,मियाभाई तांबोळी ,बारकु जाधव यांणी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: पुणे जिल्ह्यात दाेन दिवसांपासून अवकाळीने शेतीचे नुकसान: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अँक्शन मोडवर, तातडीने पंचनाम्याचे निर्देश!

Dhurandhar 2 ने पहिल्याच दिवशी कमावला 'इतक्या' कोटींचा गल्ला, बॉलिवूडच्या ओपनर सिनेमांचे सगळे रेकॉर्ड मोडले

Alphonso Mango Price : हापूसचा 'रुबाब' वाढला! 5 हजारांपासून 12 हजारांपर्यंत एक पेटी; सोन्याच्या दरात विकला जातोय कोकणचा राजा

Accident News : देवदर्शन ठरले अखेरचे ! भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांंचा दुर्दैवी मृत्यू

Jalna News: परतूर तालुक्यात कामगार योजनेत मनमानी; वर्ष उलटले तरीही क्लेम रखडलेले

SCROLL FOR NEXT