market yard.jpg 
पुणे

पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी; भाज्यांचे दर अखेर घटले

सकाळवृत्तसेवा

मार्केट यार्ड (पुणे) : सात दिवसानंतर मार्केट यार्ड सुरू झाले. त्यामुळे भाव वाढ झालेल्या फळभाज्या आणि पालेभाज्यांचे भाव कमी झाले. आठवडाभराच्या लॉकडाऊनमुळे शहरात फळभाज्या आणि पालेभाज्यांचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे किलोच्या दरात 20 ते 40 रूपयाने तर पालेभाज्यांच्या गड्डीच्या दरात 10 ते 20 रूपयाने वाढ झाली होती. परंतु मंगळवारपासून बाजार सुरू झाल्याने भाज्यांचे वाढलेले दरही घटले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

मंगळवारी भाजीपाला विभागात 411 गाड्यांतून 6 हजार 435 क्विंटल मालाची आवक झाली. फळ विभागात 141 गाड्यांतून 2 हजार 492 क्विंटल, कांदा-बटाटा विभागात 125 गाड्यांतून 9 हजार 25 क्विंटल मालाची आवक झाली.  इतर वेळी भाजीपाला, कांदा-बटाटा आणि फळ विभागात 700 गाड्यांची आवक होते. मंगळवारीही 600 ते 700 गाड्यांची आवक झाली. मागणीच्या तुलनेत आवक समाधानकारक झाल्याने भाव टिकून होते. तसेच शहरात यामुळे मुबलक भाजीपाला उपलब्ध झाला असल्याचे बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्हा प्रशासनाच्या कडक लॉकडाऊनमुळे मार्केटयार्डातील मुख्य बाजारासह मांजरी, उत्तमनगर, खडकी आणि मोशी येथील उपबाजारही बंद होता. त्यामुळे आठवडाभर शेतकर्‍यांनाही शहरात शेतीमाल घेवून येता आला नाही. पाच दिवसानंतर रविवारपासून सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत विक्रीला प्रशासनाने मुभा दिली आहे. मात्र मुख्य बाजार सुरू झाला नसल्याने शहर आणि उपनगरात भाज्यांचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे दरातही लक्षणीय वाढ झाली होती. आता बाजार सुरू झाला असल्याने भाज्या उपलब्ध होत आहेत. मागणीही काही अंशी घटली आहे. त्यामुळे दरातही घट झाली असल्याची माहिती किरकोळ भाजी विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी दिली.

किरकोळ बाजारातील भाज्यांचे किलोचे दर
भाजी  -  लॉकडाऊनमधील दर - मंगळवारचे दर
बटाटे -       50 रूपये               40 रूपये
कांदा  -      40 रूपये              30 रूपये
शेवगा -     120 रूपये             70 रूपये
मटार  -     150 रूपये           100 रूपये
दोडका -    100 रूपये            70 रूपये
भेंडी -       100 रूपये            80 रूपये
गवार -      100 रूपये           80 रूपये
फ्लॉवर -    80 रूपये            50 रूपये
कोबी -      80 रूपये           50 रूपये
दूधी भोपळा - 80 रूपये       50 रूपये

पालेभाज्यांचे गड्डीचे दर
पालेभाज्या     लॉकडाऊनमधील दर     मंगळवारचे दर
कोथिंबीर          40  रूपये                20 रूपये
शेपू                40 रूपये                 20 रूपये
पालक            30 रूपये                 20 रूपये
मेथी               40 रूपये               25 रूपये
कांदापात         40 रूपये              20 रूपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT