Narendra Modi Sakal
पुणे

पंतप्रधान मोदी आज पुण्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता. ६) मेट्रोसह विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजनासाठी पुणे दौऱ्यावर येणार असताना महामेट्रो आणि महापालिकेची तयारी पूर्ण झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता. ६) मेट्रोसह विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजनासाठी पुणे दौऱ्यावर येणार असताना महामेट्रो आणि महापालिकेची तयारी पूर्ण झाली आहे.

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (ता. ६) मेट्रोसह (Metro) विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजनासाठी पुणे दौऱ्यावर (Pune Tour) येणार असताना महामेट्रो (Mahametro) आणि महापालिकेची तयारी पूर्ण झाली आहे. महापालिकेची निवडणूक (Municipal Election) पुढील काही महिन्यात होणार असल्याने भाजपने (BJP) यानिमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन (Power Presentation) करण्याची जोरदार तयारी केली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसने मोदींच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

भाजपने महापालिकेत वेगात हालचाली करत नदी सुधार प्रकल्प (जायका) आणि नदीकाठ सुधार प्रकल्पाच्या सुमारे २५०० कोटींची कामे मंजूर केली. या प्रकल्पांचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते होत आहे. त्याचप्रमाणे आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरी, ई बस व ई बस चार्जिंग स्टेशनचेही लोकार्पण मोदी यांच्या हस्ते होणार आहे. महापालिकेत बसविलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण करून मोदींच्या पुणे दौऱ्यांची खऱ्याअर्थाने सुरवात होईल.

असा असेल दौरा

  • लोहगाव विमानतळावर १०.१५ वाजता आगमन

  • विमानतळावरून सिंचननगरपर्यंत हेलिकॉप्टरने प्रवास

  • सिंचननगर येथून कारने निघून १०.४५ ला पुणे महापालिकेत आगमन

  • छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण

  • ११.१० ला महापालिकेतून निघून गरवारे मेट्रो स्टेशनकडे रवाना

  • ११.३५ पर्यंत मेट्रोचे उद्घाटन करून मेट्रोने आनंदनगर स्टेशनपर्यंत प्रवास करणार

  • ११.४० ला आनंदनगर येथून एमआयटीच्या मैदानाकडे रवाना

  • १२ ते १ एमआयटी येथील कार्यक्रमासाठी उपस्थित (या कार्यक्रमासाठी नागरिकांनी दोन तास आधी उपस्थित राहावे)

  • १.४५ वाजता लवळे येथील सिंबायोसिस येथील कार्यक्रमाला उपस्थिती

  • २.३० वाजता विमानतळाकडे रवाना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 3rd T20I: इथे-तिथे-सगळीकडे राशिद खान... भन्नाट रन आऊट अन् दोन अविश्वसनीय झेलने फिरवली मॅच; Video Viral

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टीम इंडियाचा धावांचा एव्हरेस्ट! संजू सॅमसनची सलग फिफ्टी...

Elderly Doctor Cheated: वृद्ध महिलेच्या देखभालीच्या बहाण्याने दोन कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT