पुणे

द मेरी बी हॉर्डिंग अध्यापिका विद्यालयाच्या प्राचार्यांची वेतनवाढीच्या प्रस्तावाची चौकशी

CD

‘त्या’ प्राचार्यांच्या वेतनवाढ प्रस्तावाची होणार चौकशी

शिक्षण उपसंचालकांचे ‘डायट’च्या प्राचार्यांना पत्र; प्रशांत डोलारेंनी केली होती तक्रार
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २० : येथील मराठी मिशन ट्रस्ट संचलित द मेरी हॉर्डिंग अध्यापिका विद्यालयाच्या प्राचार्या रूपश्री येवलेकर यांनी २०२३-२४ या वर्षी वेतनवाढीचा प्रस्ताव स्वत:च पाठविला होता. बनावट प्रस्ताव सादर केल्याच्या तक्रारीवरून येवलेकर यांच्या प्रस्तावाची चौकशी करून अहवाल सादर करावा, असे आदेश शिक्षण उपसंचालकांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डायट) प्राचार्यांना दिले आहेत.
प्राचार्य असताना रूपश्री येवलेकर यांनी २०२३-२४ मध्ये स्वत:चा प्रस्ताव स्वत:च शिक्षण उपसंचालकांकडे पाठविला होता. त्याठिकाणी कागदपत्रांची कोणतीही खात्री न करता उपसंचालकांनी प्रस्तावास मंजुरी दिली. स्वत:चा प्रस्ताव सादर करण्याचे अधिकार नसताना देखील येवलेकर यांनी बनावट प्रस्ताव सादर केला आणि शासनाची फसवणूक केली, अशी तक्रार प्रशांत कमलाकर डोलारे यांनी १० मार्च २०२६ रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या संचालकांकडे केली होती. त्या तक्रारीवरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सहसंचालिका डॉ. कमलादेवी आवटे यांनी १३ मे २०२६ रोजी शिक्षण उपसंचालकांना यासंदर्भातील चौकशी करावी, असे आदेश काढले होते. मात्र, उपसंचालकांकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने डोलारे यांनी २८ जुलैला शिक्षण संचालक, उपसंचालकांना पत्र पाठवून चौकशीची मागणी केली होती. यानंतर १० ऑगस्ट रोजी शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी सोलापूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांना तक्रारीची चौकशी करून अहवाल सादर करावा, असे आदेश दिले आहेत.
---------------
चौकट
उपसंचालकांचे नेमके आदेश काय?
तक्रारदार डोलारे यांचे १० मार्च २०२६ आणि १० जून २०२६ रोजीचे तक्रारी अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच या तक्रारीच्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे सहसंचालक यांनी १३ मे रोजी चौकशीचे आदेश दिले आहेत. यानुसार मराठी मिशन ट्रस्ट संचलित द मेरी बी हॉर्डिंग अध्यापिका विद्यालयाच्या प्राचार्या रुपश्री येवलेकर यांच्या २०२४ मधील वेतनवाढीच्या प्रस्तावाची चौकशी करावी आणि त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश उपसंचालक डॉ. मोरे यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mirza Fakhrul Alamgir: बांगलादेशमध्ये मोठी राजकीय उलथापालथ! BNPचे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर नवे राष्ट्रपती, किती मतं मिळाली?

Virender Sehwag Son: जसा बाप, तसा बेटा! आर्यवीरचा शॉट पाहून चाहत्यांना झाली विरेंद्र सेहवागची आठवण, Video Viral

DJ वाल्यांनो लक्ष द्या! बेस-टॉपला हिरवा कंदील, ‘प्रेशर मिड’वर पोलिसांची नजर; पुण्यात गणेशोत्सवातील DJसाठी लवकरच नियमावली

Nalasopara Accident: भरधाव गाडीचा थरार; १६ वर्षांच्या मुलाने दोन महिलांना चिरडलं, एकीचा मृत्यू, एक गंभीर

ZP Schools Crisis: ‘मंत्र्यांच्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत शिकू द्या’; अभिजित दिपके यांचा औसा तालुक्यातील शाळांच्या दुरवस्थेवर सरकारला जाब

SCROLL FOR NEXT