The prisoner was beaten with dinner plate for not giving true answer to the crime in Pune 
पुणे

गुन्हा कसा केला? खरं उत्तर देईना म्हणून जेवणाच्या थाळीनं कैद्याचं फोडलं डोकं

सकाळवृत्तसेवा

पुणे : गुन्हा कसा केलास, या प्रश्‍नाचे खरे उत्तर दिले नाही, म्हणून एका कैद्याने दुसऱ्या कैद्याला जेवणाच्या थाळीने मारहाण करीत जखमी केल्याचा प्रकार उघडकीस आला. ही घटना येरवडा येथील तात्पुरत्या कारागृहामध्ये शनिवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. 

सोहेल इसाक शेख (वय 19) असे जखमी झालेल्या कैद्याचे नाव आहे. तर तेजस तुकाराम येनपुरे असे गुन्हा दाखल झालेल्या कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी सत्वशील पाटील यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेख व येनपुरे हे दोघेही येरवड्यातील तात्पुरत्या कारागृहामध्ये बंदिवान आहेत. दोघेही एकाच खोलीमध्ये आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दोन दिवसांपूर्वी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास येनपुरे याने शेख यास ''तु गुन्हा कसा केलास'', याबाबत वारंवार विचारणा केली. त्यावेळी त्याने येनपुरेला त्याने केलेल्या गुन्ह्याची माहिती दिली. मात्र शेख हा खोटी माहिती देत असल्याचे सांगत चिडलेल्या तेजन येनपुरे याने शेख यास हाताने मारहाण केली. त्याचवेळी येनपुरे याच्या हातात असलेल्या जेवणाच्या थाळीने शेख याच्या डोक्‍यात मारून त्यास जखमी केले. कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेख यास तत्काळ रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बनसवडे करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT