Yerwada Jail sakal
पुणे

Yerwada Jail : येरवडा कारागृहातून पळून गेलेला कैदी स्वत:हून हजर

येरवड्यातील खुल्या जिल्हा कारागृहातून पळून गेलेला कैदी बुधवारी (ता. २२) स्वत:हून कारागृहात हजर झाला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - येरवड्यातील खुल्या जिल्हा कारागृहातून पळून गेलेला कैदी बुधवारी (ता. २२) स्वत:हून कारागृहात हजर झाला. खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी आशिष भरत जाधव हा सोमवारी कारागृहातून पळून गेला होता.

येरवडा येथील खुल्या जिल्हा कारागृहातून आशिष जाधव या कैद्याने पलायन केले होते. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिस त्याचा शोध घेत होते. पोलिसांनी कैद्याच्या नातेवाइकांशी संपर्क साधला असता, त्याची आई हृदयविकाराने आजारी होती. त्यामुळे त्याने कारागृहातून पलायन केले असावे, अशी माहिती मिळाली.

दरम्यान, कैदी आशिष जाधवचे आई-वडील त्याला कारागृहात हजर करण्यासाठी आज घेऊन आले. कारागृह प्रशासनाने ही बाब येरवडा पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलिसांनी कैद्याला ताब्यात घेतले. आईच्या काळजीपोटी त्याने पलायन केल्याची शक्यता आहे. आईची तब्येत ठीक असल्यामुळे तो स्वत:हून हजर झाला, असे कारागृह प्रशासनाकडून सांगण्यात आले.

प्रशासन म्हणते, खुल्या कारागृहातून जाणे कठीण नाही

येरवडा खुले जिल्हा कारागृहात सुरक्षा व्यवस्था कमी असते. त्यामुळे तेथून निघून जाणे कठीण नाही, असा दावा कारागृह प्रशासनाकडून करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT