पुणे

खासगी प्रवासी बसला पुण्यात अखेर प्रवेश

सकाळवृत्तसेवा

पुणे - प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसला पुण्यात सकाळी आठ ते दुपारी बारा आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ वगळून विशिष्ट मार्गांवर प्रवेश करण्यास वाहतूक पोलिसांनी मंजुरी दिली आहे, त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या १५ नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.  

वाहतूक पोलिसांनी सकाळी सहा ते रात्री दहा दरम्यान खासगी बसना शहरात प्रवेश करण्यास बंदी घालण्याचे सूतोवाच केले होते. त्याला प्रवाशांनी तसेच बस वाहतूकदारांनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होईल, अशी चिन्हे होती. या पार्श्‍वभूमीवर बंदीच्या निर्णयात सुधारणा करीत गर्दीच्या वेळेतच बसना शहरात प्रवेश करण्यास बंदी घातली. त्या वेळेत बस आल्या तर त्यांनी शहराबाहेर त्या उभ्या करून स्वतःच्या वाहनांद्वारे प्रवाशांना शहरात सोडायचे आहे, असेही त्यांना बजावले आहे.   

सातारा, सोलापूरकडे वाहतूक करणाऱ्या बसना व्होल्गा चौकातून, नगर, नाशिक आणि मुंबईकडे वाहतूक करणाऱ्या बसना संगमवाडीपर्यंत प्रवेश करता येईल. तेथून पुढे मार्गस्थ होण्यासाठी त्यांना विशिष्ट मार्ग ठरवून दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price Today: पेट्रोल-डिझेल आणि CNG चे नवे दर जाहीर; पुणे, मुंबईसह महाराष्ट्रात आज किती भाव?

Latest Marathi News Update : चित्रपट महामंडळ निवडणुकीत समर्थ पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी

Uddhav Thackeray INDIA Alliance : उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतून बाहेर पडणार?, ठाकरेंच्या सवालाने दिल्लीतील बैठकीत नाराजीचे सूर

Donald Trump : मैत्रीत दुरावा ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांना इराण हल्ल्यावरुन कडक इशारा, नेमकं काय घडलं?

राऊत-देशमुख चौथ्यांदा भेट; मित्रासाठी मालक मैदानात, विधान परिषद निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा, मैत्रीची साथ अन् पक्षनिष्ठेचा संदेश..

SCROLL FOR NEXT