पुणे

खासगी क्‍लासेसला परवानगी मिळणार; पुणे महापालिका आखणार नवीन नियमावली

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहरात कोरोनाबाबतची (अनलॉक-४) बंधने उठविताना स्पर्धा परीक्षेसह वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि अकरावी-बारावीच्या क्‍लासेसला परवानगी देण्याची तयारी महापालिकेने केली आहे. 

हे वर्ग भरवताना क्‍लास चालकांवर कठोर बंधने राहणार असून विद्यार्थी, शिक्षक आणि वर्ग भरणाऱ्या इमारतीतील रहिवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची अट असेल. त्यासाठी नवीन नियमावली आखली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

क्‍लासेस सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय होईल, असे संकेतही आयुक्त विक्रम कुमार यांनी गेल्या आठवड्यात दिले होते. परीक्षा घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे; परंतु, केंद्राच्या नवीन नियमांनुसार पुढील महिनाभर शाळा, महाविद्यालयांची दारे उघडणार नसल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे पालक-विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या पार्श्‍वभूमीवर पुढीलवर्षी परीक्षा होणार असल्याने खासगी शिकवण्यांचे वर्ग सुरू करण्याची मागणी क्‍लास चालकांनी लावून धरली आहे. पालक-विद्यार्थ्यांचीही तशीच मागणी आहे. याअनुषंगाने गणेश विसर्जनानंतर म्हणजे २ किंवा ३ सप्टेंबरपासून क्‍लासेसला परवानगी मिळण्याची शक्‍यता आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बाधित क्षेत्र नसणार
पुणे शहरातील ज्या भागात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, अशा भागाचा बाधित क्षेत्रात (कंटेन्मेंट झोन) समावेश करून तेथे बंधने लागू केली जातात. त्यानुसार ‘अनलॉक-३’मध्ये जवळपास ६६ बाधित क्षेत्र आहेत. या क्षेत्रातील हॉटेल वगळता सर्व व्यवहार सुरू आहेत. आता पूर्वीप्रमाणे बाधित क्षेत्रात कठोर नियमावली नसेल. तसेच, बाधित क्षेत्रही नसेल, असे महापालिका प्रशासनाने सांगितले.

कोरोना संसर्गाचा आढाव घेऊन पुण्यातील व्यवहारांबाबत नवे नियम असतील. ते पुढील दोन दिवसांत जाहीर करण्यात येतील.
- रूबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईचीही सुरावात खराब; चार फलंदाज तंबूत

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT