Corona Patients Sakal
पुणे

Pune : खासगीत अवाच्या सव्वा बिले!

जिल्ह्यात ७० टक्के कोरोना रुग्णांना वाढीव दर; जन आरोग्य अभियानाचा दावा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्णांना, तसेच दगावलेल्या रुग्णांपैकी ६५ टक्के रुग्णांना नियंत्रित दरापेक्षा वाढीव बिले आकारल्याचा दावा, एका सर्वेक्षणात केला आहे. कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती आणि जन आरोग्य अभियानातर्फे जिल्ह्यातील १० तालुक्यांत १२१ तक्रारदार रुग्णांचे सर्वेक्षण केले आहे.

नवी पेठेतील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात आयोजित ‘संताप सभे’त ही मांडणी करण्यात आली. यावेळी कोरोना विधवा महिला, समितीचे मयूर बागल, उषा वखारे, डॉ. अभय शुक्ला आदी उपस्थित होते. राज्यभरात समितीतर्फे हेरंब कुलकर्णी यांच्या नेतृत्वात सर्वेक्षण झाले आहे. राज्यभरात प्रत्येक रुग्णामागे सरासरी एक लाख ८४ हजार वाढीव बिलाची रक्कम आकारली होती. पुण्यात हीच रक्कम दोन लाख २६ हजार असल्याचे समितीने म्हटले आहे. डॉ. शुक्ला म्हणाले, ‘सरकारने उपचाराचे दर ठरवून दिल्यानंतरही खासगी रुग्णालयांनी लूटमार केली. अनेक विधवा महिलांना किंवा मृतांच्या नातेवाइकांना कर्ज काढून बिलांचा भरणा करावा लागला आहे. यासंबंधी आम्ही खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली असून, आरोग्यमंत्र्यांशीही चर्चा करणार आहोत.’’ राज्यात दोन हजार ५७९ रुग्णांचे सर्वेक्षण झाले असून, त्यात एक हजार विधवा महिला आहे.

या आहेत मागण्या...

  • बिलांच्या लेखापरीक्षणासाठी आयोग स्थापन करावा

  • वाढीव बिलातील रक्कम परत द्या

  • दोषी खासगी रुग्णालयांवर कारवाई करावी

  • विधवा महिलांना रोजगाराची व्यवस्था करावी

  • दिल्ली, राजस्थान, बिहार आदी राज्यातील कल्याणकारी योजना कोरोना विधवांना लागू कराव्यात

  • दर नियंत्रण आदेशाला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी

जलद सर्वेक्षणाचे निष्कर्ष

  • विधवा झालेल्या ६१ महिलांपैकी

  • ४० महिलांचे वय ५०च्या आत

  • यातील २३ महिलांना एक लाखापेक्षा अधिक वाढीव बिल

  • या सर्व रुग्णांना सरासरी दर दिवशी २२ हजार १७३ रुपयांचे बिल आकारण्यात आले

  • सर्वेक्षणापैकी केवळ ६.६ टक्के रुग्णांना महात्मा फुले जण आरोग्य योजनेचा लाभ मिळाला

एप्रिलमध्ये पती, सासरे आणि मुलाला कोरोना झाला. त्यांना खासगी रुग्णालयात भरती केले. त्यात पती आणि नंतर सासऱ्यांचा मृत्यू झाला. उपचारासाठी अडीच लाख रुपये खर्च झाले. आता कुणाकडे मदत मागू.

- बबिता कोंडे, हडपसर (नाव बदलले आहे)

घरात दोन मुलं आहेत. पती खासगी कंपनीत काम करत होते. कोरोनात त्यांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. भाड्याच्या घरात राहणाऱ्या दिराने आश्रय दिला. पण, तेथे किती दिवस राहणार? माझ्या मुलासाठी काहीतरी करायचंय.

- राजश्री वारे, शिरूर (नाव बदलले आहे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT