Doctor 
पुणे

Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये महापालिकेच्या मदतीला खासगी रुग्णालये सरसावली

सकाळवृत्तसेवा

कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर तपासणी व उपचाराची सुविधा
पिंपरी - कोरोनाचा सामना करण्यासाठी महापालिकेच्या मदतीला शहरातील खासगी रुग्णालयेही पुढे सरसावली आहेत. आठ रुग्णालयात उपचार व तपासणीची सुविधा उपलब्ध आहे. त्यांच्याकडे गेल्या आठ दिवसांत ५८ जणांच्या घशातील द्रवांचे नमुने एनआयव्हीकडे तपासण्यात आले आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या मदतीला आठ खासगी रुग्णालये पुढे आली आहेत. त्यांच्याकडे तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय आणि महापालिकेचे वायसीएम रुग्णालय यांच्यात तर सामंजस्य करार झाला आहे. त्यानुसार, वायसीएममध्ये केवळ आयसोलेशन कक्ष व क्वारनटाइन कक्ष आहे. तर वायसीएममधील सामान्य रुग्ण डीवाय पाटील रुग्णालयात दाखल केले आहेत. गेल्या आठ दिवसांत ५८ रुग्ण तपासण्यात आले आहेत. त्यांच्या घशातील द्रवांचे नमुने एनआयव्हीकडे तपासण्यात आले आहेत. महापालिका रुग्णालयांत येऊ न शकणारे नागरिक खासगी रुग्णालयातील तपासणीसाठी प्राधान्य देत आहेत. 

रुग्णालयांचे संपर्क क्रमांक
रुग्णालय                क्रमांक

वायसीएम पिंपरी    ०२०-६७३३२२२२
भोसरी नवीन   ९५५२५७८७३१
जिजामाता पिंपरी  ९८५०२७९२३८
लोकमान्य निगडी.    ९५६१५८४८३८
लोकमान्य चिंचवड.   ९८२३४०९९०८
डीवाय पाटील पिंपरी ९८२३३०७७०३
बिर्ला थेरगाव  ९८८११२३००८
ग्लोबल थेरगाव    ९८९०६६९५६५
संत ज्ञानेश्वर, मोशी   ९६८९८८८३०९
स्टर्लिंग, निगडी-प्राधिकरण    ९८५०९३३५१२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pimpri Chinchwad News: धार्मिकतेच्या नावे भूखंड हडपण्याचे उद्योग; पिंपरी चिंचवडमधील कारभाऱ्यांचे कारनामे, अनेक ठिकाणी अतिक्रमणे!

Ahilyanagar Crime: पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष; विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबाला १० वर्षांची शिक्षा,न्यायालयाचा निर्णय..

'कमळी' आणि 'सनई चौघडे' मालिकांचा महासंगम! जय, शर्वरी, ऋषी आणि कमळीचा निर्णय पडणार का त्यांच्यावरच भारी?

Latest Marathi News Live Update : अमरावतीत उष्णतेचा कहर; आजही तापमान 46 अंशांच्या पार जाण्याची शक्यता

Pune Petrol Diesel Rate Hike: वाहनधारकांची चिंता वाढली; चार दिवसांत दुसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल दरवाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला फटका..

SCROLL FOR NEXT