पुणे

खासगी प्रवासी वाहतूकदारांनी वेळा बदलल्या 

सकाळवृत्तसेवा

पुणे - सकाळी नऊ ते अकरा आणि सायंकाळी सहा ते आठ ही वेळ वगळून शहरात प्रवेश करण्याचा निर्णय खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचालकांनी सोमवारी झालेल्या बैठकीत घेतला. त्यानुसार नागपूर, अमरावती, चंद्रपूरला जाणाऱ्या बस सुटण्याच्या वेळा बदलण्याचेही ठरले. 

शहरात सकाळी सहा ते रात्री दहा वाजेच्या दरम्यान खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसला बंदी घालण्याचे सूतोवाच वाहतूक पोलिसांनी केले होते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे, हे चालकांनी पोलिसांच्या निदर्शनास आणले. त्यामुळे दीपावली लक्षात घेऊन प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून तूर्त बसचालकांनी वर्दळीची सकाळी नऊ ते अकरा आणि सायंकाळी सहा ते आठ ही वेळ वगळून वाहतूक करावी, असे पोलिसांनी सुचविले. दरम्यान, पुणे डिस्ट्रिक्‍ट लक्‍झरी बस असोसिएशनची सोमवारी सायंकाळी बैठक झाली. त्याला संघटनेचे 100 सदस्य उपस्थित होते. 

शहरात सकाळी नऊ ते अकरा आणि सायंकाळी सहा ते आठ ही वेळ वगळून प्रवेश करण्यासाठी बाहेरून सुटणाऱ्या बसच्या वेळा बदलण्याचेही ठरले. त्यामुळे नागपूरहून एरवी सायंकाळी पाच वाजता सुटणारी आणि सकाळी नऊ वाजेपर्यंत शहरात प्रवेश करणारी बस आता दुपारी तीन वाजता सुटणार असून, सकाळी सातपर्यंत ती शहरात पोचेल. अमरावती, चंद्रपूर आदी लांबच्या मार्गांबाबतही असाच निर्णय झाल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब खेडेकर यांनी दिली. या निर्णयाची लगेचच अंमलबजावणी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

नियमांचे पालन करून भाडेवाढ 
सणाच्या काळात प्रवासीभाडे वाढविण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. उच्च न्यायालयाने याबाबत आदेश दिला असून, त्याचे पालन करण्याचेही ठरले. सणाच्या काळात एसटी महामंडळाच्या बसच्या भाड्याच्या दीडपट भाडे वाढविता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्याचे पालन करूनच भाडेवाढ झाली आहे. सणाच्या काळात पुण्यातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते. मात्र परतीच्या प्रवासाला पुरेसे प्रवासी मिळत नाहीत. त्यामुळे भाडेवाढ करावी लागते, असेही बाळासाहेब खेडेकर यांनी सांगितले. 

पिकअप पॉइंट्‌सवर चर्चा 
प्रवासी वाहतूक करणाऱ्या संघटनेची वाहतूक पोलिसांबरोबरच नुकतीच बैठक झाली. प्रामुख्याने पिकअप पॉइंट्‌सवर त्यात चर्चा झाली. त्यानुसार वाहतूकदार येत्या दोन दिवसांत पोलिस आणि महापालिकेकडे पिकअप पॉइंट्‌सची यादी देणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT