पुणे

खासगी प्रॅक्टिस सुरूच

सकाळवृत्तसेवा

येरवडा - पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी पगाराच्या तब्बल ३५ टक्के नॉन-प्रॅक्‍टिसिंग अलाउन्स घेऊनही खासगी प्रॅक्टिस करतात. त्यामुळे आरोग्य विभागाने सर्वच डॉक्‍टरांकडून खासगी प्रॅक्टिस न करण्याचे हमीपत्र लिहून घेतले. मात्र, या हमीपत्रालाही काही डॉक्‍टरांनी केराची टोपली दाखवीत आपली प्रॅक्टिस सुरूच ठेवली आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात १५६ वैद्यकीय अधिकारी आहेत. यातील अनेक डॉक्‍टर पुणे शहर व पिंपरी-चिंचवडमधील खासगी मोठ्या रुग्णालयांत नियमबाह्य वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. याची दखल घेत ‘सकाळ’ने नॉन-प्रॅक्‍टिसिंग अलाउन्स घेणारे वैद्यकीय अधिकारी खासगी प्रॅक्टिस करीत असल्याचे वृत्त दिले होते. त्यानंतर आरोग्यप्रमुखांनी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून खासगी प्रॅक्टिस न करण्याचे हमीपत्र लिहून घेतले होते. मात्र, या हमीपत्राला डॉक्‍टरांनी केराची टोपली दाखविली आहे. अनेक डॉक्‍टर पुणे शहर व पिंपरी-चिंचवड परिसरातील खासगी मोठ्या रुग्णालयांत दुसऱ्याच्या नावाने, तर कुठे स्वत:चे नाव वापरून प्रॅक्टिस करीत आहेत.

सरकारी आरोग्य विभागात कार्यरत असलेले; मात्र नॉन-प्रॅक्‍टिसिंग अलाउन्स न घेणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना ग्रामीण व शहरी भागात काही ठरावीक किलोमीटरच्या क्षेत्रफळात खासगी प्रॅक्टिस करता येते. मात्र, नॉन-प्रॅक्‍टिसिंग अलाउन्स घेणाऱ्यांना तशी प्रॅक्टिस करता येत नसल्याचे पुणे महापालिका आरोग्यप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT