AKL26B17038
प्रिया कातोरे
प्रियाच्या आयुष्यात आनंदाचा स्वर
श्रवणयंत्रामुळे शिक्षणाचा मार्ग सुकर ः विखे परिवाराकडून श्रवणयंत्र भेट
अकोले, ता. १६ : लहानपणापासून ऐकू न येणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीच्या आयुष्यात विखे परिवाराच्या मदतीमुळे आनंदाचे सूर उमटले आहेत. कानात श्रवणयंत्र बसविल्यानंतर प्रथमच आवाज ऐकू आल्याने आठ वर्षीय प्रिया कातोरे हिच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे.
अकोले तालुक्यातील उंचखडक बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीत शिक्षण घेणारी प्रिया कातोरे ही जन्मजात कर्णबधीर. पालकांनी विविध ठिकाणी उपचार करून श्रवणयंत्र मिळविण्यासाठी प्रयत्न केले. अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी यांच्याकडे मदतीची याचना केली; मात्र अपेक्षित सहकार्य मिळाले नाही.
दरम्यान, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲड. सागर शिंदे यांनी पुढाकार घेतला. अकोले विखे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष विकास वाकचौरे यांच्या माध्यमातून ही बाब जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. कातोरे कुटुंबाच्या परिस्थितीची दखल घेत त्यांनी तत्काळ प्रियासाठी दर्जेदार श्रवणयंत्र उपलब्ध करून दिले.
प्रियाचे आई-वडील शेतमजूर म्हणून काम करतात. पैसे नसल्याने मुलीवर आवश्यक उपचार करणे त्यांना शक्य झाले नव्हते. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही श्रवणयंत्र मिळत नव्हते.
शाळेत नियमित उपस्थिती असूनही प्रिया शिक्षकांनी शिकविलेले समजू शकत नव्हती. तिची ही अवस्था पाहून काही काळ तिला कर्णबधिर शाळेत प्रवेश देण्यात आला होता; मात्र तेथील वातावरणाशी जुळवून घेण्यात अडचणी येत असल्याने पुन्हा जिल्हा परिषद शाळेत दाखल करण्यात आले.
अखेर विखे परिवाराच्या सहकार्यामुळे प्रियाला श्रवणयंत्र मिळाले. शाळेच्या पहिल्याच दिवशी तिच्या कानात हे यंत्र बसविण्यात आले. कालपर्यंत केवळ ओठांच्या हालचाली पाहून संवाद साधणारी प्रिया आता मैत्रिणींचा गोंधळ, शिक्षकांचा आवाज ऐकू लागली. वर्गशिक्षिका क्षीरसागर यांनी विचारलेल्या प्रश्नांची तिने उत्स्फूर्तपणे उत्तरे दिल्याने शिक्षक व पालकही आनंदून गेले.
चौकट---
जीवनास नवी दिशा
श्रवणयंत्रामुळे प्रियाच्या शैक्षणिक प्रगतीचा मार्ग सुकर होऊन तिच्या उज्ज्वल भविष्यास नवी दिशा मिळाल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.