पुणे

पाककृती स्पर्धेत प्रियांका पेणकर प्रथम

सकाळवृत्तसेवा

पुणे -  ‘सकाळ’ व त्वष्टा कासार समाज संस्था गणेशोत्सवतर्फे महिलांसाठी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कसबा पेठेतील श्री महाकालिकामाता मंदिरात झालेल्या या स्पर्धेत प्रियांका पेणकर (उकडीचे मोदक) प्रथम क्रमांक यांनी मिळवला.

नवरात्रोत्सवानिमित्ताने घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये तरुणींपासून ज्येष्ठ महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मंडळाच्या कार्यक्रम समितीच्या उपाध्यक्ष गिरिजा पोटफोडे म्हणाल्या, ‘‘अशा प्रकारचे कार्यक्रम हे महिलांचा उत्साह वाढवणारे असतात. या वेळी घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमामुळे मन आनंदी झाले.’’

या स्पर्धेत द्वितीय क्रमांक नयना दांडेकर(चकली) व तृतीय क्रमांक स्वाती कोटकर (उपवासाचे मेंदू वडे) यांनी पटकवला. तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक सोनाली आर्ते, सुनीता सातव व श्रद्धा निजामपूरकर यांनी मिळाले. स्पर्धेचे परीक्षण पाककला तज्ज्ञ सुजाता नेरूरकर यांनी केले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष सतीश करडे, कार्यावाहक दिलीप खुळे उपस्थित होते. गिरिजा पोटफोडे, अंजलेश वडके, मिलिंद पोटफोडे, अश्‍विनी वडके यांनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best FD Investment: RBI च्या निर्णयानंतर 1 लाखासाठी कोणती FD फायद्याची? शॉर्ट टर्म की लॉन्ग टर्म? पाहा संपूर्ण गणित

370 रुपयांच्या बिर्याणी वादानंतर प्रणित मोरेचं कमबॅक; पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'

रितेशच्या जाळ्यात अडकणार 'कमळी'? तर स्वतःच्याच घरात 'तारिणी' शोधणार शत्रूचा चेहरा; झी मराठीच्या टॉप २ मालिकांमध्ये पुढे काय घडणार?

Marathi News Live Updates : एकनाथ शिंदे यांच्यावरील गद्दारीचा डाग आम्ही मराठ्यांनी पुसला, आता हीच उपकाराची परतफेड का? मनोज जरांगे यांचा थेट सवाल

पत्नीचा पगार १ लाख, तरी महिना ४० हजार पोटगी द्यावी लागणार; पुणे कोर्टाचा पतीला दणका

SCROLL FOR NEXT