asha 
पुणे

दुर्गम वेल्ह्यात कोरोनाशी लढणाऱ्या आशा सेविकांना अनोखी भेट

मनोज कुंभार

वेल्हे (पुणे) : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी दुर्गम वेल्हे तालुक्‍यातील राजगड- तोरणा या किल्ल्यांच्या परिसरात डोंगरदऱ्यात गेल्या सहा महिन्यांपासून पायपीट करणाऱ्या आशा सेविकांना वेल्हे तालुका पंचायत समितीच्या वतीने शेष फंडातून प्रत्येकी पाच हजार रुपयांचे बक्षीस (प्रोत्साहन भत्ता) देण्यात येणार आहे. 

शेष फंडातून तालुक्‍यातील 48 आशा कर्मचारी व 3 गट प्रवर्तक अशा 51 कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपये जमा करण्यात येणार आहे. यामध्ये ऑगस्ट ते डिसेंबर 2020 पर्यंत महिन्याला एक हजार रुपयांप्रमाणे पाच महिन्यांचे मिळून पाच हजार रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार असून, ऑगस्ट महिन्याचे एक हजार रुपये संबंधित कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा झाल्याची माहिती गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी दिली. 

वेल्हे तालुका पंचायत समितीचे सभापती दिनकर सरपाले, उपसभापती सीमा राऊत, माजी सभापती संगीता जेधे, पंचायत सदस्य अनंत दारवटकर, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे व दिनकर धरपाळे यांनी यासाठी पुढाकार घेतला. तहसीलदार शिवाजी शिंदे, तालुका आरोग्य डॉ. अंबादास देवकर, तालुका बालविकास अधिकारी साधू चांदणे, सहायक पोलिस निरीक्षक विनायक देवकर आदींनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. 

वेल्हे तालुका हा राज्यात अतिदुर्गम व मागास आहे. लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे अनेक आशा कर्मचाऱ्यांना चार ते पाच गावांत काम करावे लागत आहे. तुटपुंज्या मानधनात काम करणाऱ्या महिलांना चार ते पाच किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागत आहे. तालुक्‍यातील खेडोपाडी कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आशा सेविका घरोघरी जात आहेत. माहिती गोळा करत आहे. त्यामुळे कोरोनाचा उद्रेक रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे, असे जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांनी सांगितले.  आशा कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन बक्षीस देण्यात आले आहे. असे बक्षीस देणारी वेल्हे पंचायत समिती ही राज्यातील पहिली पंचायत समिती असावी, असे वेल्हे पंचायत समितीचे सभापती दिनकर सरपाले यांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT