पुणे

बांधकामांसाठी प्रक्रियायुक्त पाणी वापरणे बंधनकारक

CD

पिंपरी, ता. २८ : शहरातील बांधकामांसाठी प्रक्रिया केलेले पाणी वापरणे बंधनकारक करण्यात येणार आहे. नवीन बांधकाम परवानगी घेतल्यानंतरही या नियमातून सूट मिळणार नाही. बांधकामांना पिण्याचे पाणी पुरवले जाणार नसून, टँकरद्वारेही असा पुरवठा होऊ नये, यासाठी कठोर भूमिका घेणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
शहरातील पाणीपुरवठा, अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे आणि कचरा व्यवस्थापनाबाबत संवाद साधताना त्यांनी आगामी नियोजन स्पष्ट केले. पिण्याच्या पाण्यावरील वाढता ताण कमी करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांना प्रक्रिया केलेले पाणी वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी तपासण्यासाठी बांधकामस्थळी अचानक भेटी दिल्या जातील. उल्लंघन आढळल्यास कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

‘ओटीपी’ आधारित यंत्रणा
टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी ‘ओटीपी’ आधारित यंत्रणा वापरली जात आहे. मात्र, सध्या टँकरवर महापालिकेचे थेट नियंत्रण नसल्याचेही सूर्यवंशी यांनी नमूद केले. बांधकामांना टँकरमधून पिण्याचे पाणी मिळत असल्यास त्यावरही लक्ष ठेवण्यात येणार आहे.

मिळकत नोंदणीला प्रतिबंध
अनधिकृत बांधकामांची खरेदी-विक्री आणि पुनर्विक्रीची नोंदणी रोखण्यासाठी नोंदणी महानिरीक्षकांकडे यादी पाठविली आहे. संबंधित मालमत्तांना वीजजोडणी आणि पाणीपुरवठा मिळू नये, यासाठीही प्रस्ताव दिले आहेत. हरित सेतू परिसरातील टपऱ्यांसह अतिक्रमणांवर कारवाई केली जाणार आहे. टपरी हटविण्यासाठी एका तासाची मुदत दिली जात असून, कारवाईला विरोध केल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील.

रावेतमध्ये कचरा प्रक्रिया केंद्र
रावेतमध्ये कचरा डेपो उभारण्यात येणार नसून, दररोज सुमारे ३०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारे केंद्र नियोजित आहे. संबंधित जागा अद्याप महापालिकेच्या ताब्यात आलेली नाही. आवश्यक परवानग्यांची प्रक्रियाही बाकी असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. प्रकल्पासाठी बीपीसीएलकडून काम सुरू असून, अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. शहरात चार कचरा हस्तांतरण केंद्रेही उभारण्यात येणार आहेत.

भामा आसखेडचे पाणी जानेवारीअखेर
मोशीतील कचरा प्रक्रिया प्रकल्प नोव्हेंबरअखेर सुरू करण्याचे नियोजन आहे. तसेच भामा आसखेड योजनेतून जानेवारीअखेरपर्यंत शहराला पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. या योजनेमुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर असलेला ताण कमी होण्यास किती मदत होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2027 Auction Live: अमरावतीची लेक, Mumbai Indians च्या ताफ्यात! फ्रँचायझीने ऑलराउंडरसाठी किती रक्कम मोजली? RCB च्या WPL विजेत्या संघाची होती सदस्य

Marathi News Live Updates : मराठवाडा पदवीधर निवडणुकीत विजयाची आघाडी मिळताच राष्ट्रवादी शरद पवार गटाचा धाराशिवमध्ये जोरदार जल्लोष!

IND W vs ZIM W: भारतीय महिला संघाची विजयी हॅटट्रिक! ५ विकेट्स घेऊन झिम्बाब्वेचे कंबरडे मोडणारी Vaishnavi Sharma कोण?

Narendra Modi Post: ''बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या, मग काँग्रेसने किती जागा जिंकल्या?'', पंतप्रधान मोदींची पोस्ट, विरोधकांना चिमटा

Islapur News : रोडा नाईक तांडा येथील जिल्हा परिषद शाळा एकाच शिक्षकाच्या भरोशावर! २५ विद्यार्थ्यांचे चार वर्ग सांभाळताना शिक्षकाची कसरत

SCROLL FOR NEXT