gorl born2 
पुणे

मुलगी जन्माला आली; गावात मिरवणूक काढली! 

महेंद्र शिंदे

कडूस (पुणे) : राजगुरुनगर (ता. खेड) येथील थिगळे कुटुंबामध्ये सुमारे 55 वर्षांनंतर मुलगी जन्माला आली. त्यामुळे आनंदित झालेल्या थिगळे कुटुंबीयांनी पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचत, फुगड्या खेळत जल्लोषात पेढे वाटून तिचे घरी स्वागत केले. रंगीबेरंगी फुग्यांनी व आकर्षक फुलांनी सजवलेल्या घरात रांगोळीचा सडा व फुलांच्या पायघड्यांमध्ये आपल्या लाडक्‍या शांभवी या लेकीचा गृहप्रवेश मोठ्या आनंदात साजरा केला. एकीकडे नकोशी म्हणून झिडकरणाऱ्या स्त्री जन्माचे थाटात स्वागत करून थिगळे कुटुंबाने एक आदर्श घालून दिला आहे. 

राजगुरुनगर येथील समीर व नीलिमा थिगळे या दांपत्याला कन्यारत्न झाले. त्यांच्या कुटुंबात सुमारे 55 वर्षांनंतर मुलगी जन्माला आली. त्यामुळे आनंदी झालेल्या थिगळे कुटुंबाने तिच्या आगमनाचे स्वागत व तिचा गृहप्रवेश रविवारी (ता. 8) मोठ्या थाटामाटात व वाजतगाजत केला. तिचे "शांभवी' असे नामकरण करण्यात आले. जन्मानंतर मामाच्या गावावरून पहिल्यांदाच आपल्या घरी आलेल्या शांभवी व तिच्या आईचे स्वागत सनईच्या सुरात व फटाक्‍यांच्या आतषबाजीत झाले. त्यांच्या स्वागतासाठी थिगळे कुटुंबाने घरापासून दोनशे मीटर अंतरापर्यंत राजगुरुनगर- बहिरवाडी रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढली आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात वाजतगाजत तिला घरी आणले. 

या मिरवणुकीत शांभवीची आजी अलका व आजोबा नामदेव थिगळे, मामा राहुल गावडे, थिगळे कुटुंबाचे सगेसोयरे, भाऊबंद व परिसरातील महिला नटूनथटून सहभागी झाल्या होत्या. सर्वच महिला फुगड्या खेळल्या. शांभवीच्या स्वागतासाठी घराबाहेर रंगीबेरंगी फुग्यांची मोठी कमान उभारली होती. पाळण्यासह घर व परिसर आकर्षक फुलांनी सजवला होता. उंबरठा ओलांडताना तिच्या गृहप्रवेशासाठी फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. त्यावरून गृहप्रवेश होताना तिचे पाऊलठसे घेण्यात आले. 

स्त्रीच्या जन्माने नाकतोंड मुरडणाऱ्या मानसिकतेच्या युगात मुलीच्या जन्माचे वाजतगाजत केलेले स्वागत व थाटामाटातील गृहप्रवेशाबाबत थिगळे कुटुंबाचे कौतुक होत आहे. 

आमच्या घरात 55 वर्षांनी मुलगी जन्माला आली आहे. सर्व कुटुंब खूप आनंदी आहे. या आनंदात नातीचे स्वागत केले. मुलगा- मुलगी एक समान आहेत. स्त्री जन्माचे स्वागत प्रत्येकाकडून व्हायला पाहिजे. स्त्रीभ्रूणहत्या पाप आहे. हे पाप व्हायला नको, यासाठी जागृती झाली पाहिजे 
- अलका थिगळे, मुलीची आजी 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Ahilyanagar Crime: खर्ड्यात तान्हाजी बोराडे खूनप्रकरणाचा दोन दिवसांत छडा; १८ वर्षीय तरुणासह तीन अल्पवयीन ताब्यात

Marathi News Live Updates : तलावातून निघते गणरायाची पालखी; रायगडच्या साले गावातील अनोखी परंपरा

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

SCROLL FOR NEXT