पुणे

कर्जत - गटनेते पदी प्रा.सतीश पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब

CD

KJT26B07351
अहिल्यानगर ः येथे गटनेतेपदी प्रा. सतीश पाटील यांची निवड झाल्यावर उपस्थित नगरसेवक.
-----------------------------

प्रा. सतीश पाटील यांच्याकडे गटनेतेपद
माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, ऊषा राऊत यांचा पाठिंबा
कर्जत, ता. ९ ः कर्जत नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदाच्या वादावर अखेर जिल्हाधिकाऱ्‍यांनी महत्त्वपूर्ण निर्णय देत प्रा. सतीश पाटील यांना गटनेता म्हणून मान्यता दिली आहे. पाटील यांना १५ पैकी ११ नगरसेवकांनी पाठिंबा दिला. माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत व उषा राऊत यांचा पाठिंबा ऐनवेळी मिळाला. त्यामुळे कर्जतमधील राजकीय समिकरणे बदलली आहेत.

कर्जत नगरपंचायतीच्या गटनेतेपदासाठी ज्योती शेळकेंसह १४ नगरसेवकांनी ४ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रस्ताव सादर केला. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी संतोष मेहेत्रे यांची निवड करण्यात आली होती. सतीश पाटील यांनी पक्षाच्या नगरसेवकांची गटनेते बदलासाठी २४ एप्रिल रोजी बैठक बोलावली होती. प्रा. पाटील यांनी आपल्याला १५ पैकी नऊ नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. या निर्णयाला गटनेते संतोष मेहेत्रे यांनी आक्षेप घेत जिल्हाधिकारी कार्यालयात दावा दाखल केला होता. आपली अधिकृत गटनेतेपदी निवड झाली आहे, गट नेत्याला पक्षाच्या नगरसेवकांची बैठक बोलविण्याचा अधिकार आहे. गटनेता अनुपस्थित असेल, तर उपनेत्याला गटनेत्याचे सर्व अधिकारी प्राप्त होतात. ही बैठक बेकायदेशीर आहे, तसेच व्हॉटसॲपद्वारे माहिती देणे बेकायदेशीर आहे, असे म्हणणे सादर केले होते.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी गुरुवारी (ता. ७) दुपारी साडेबारा वाजेपर्यंत गटनेते संतोष मेहेत्रे यांना बैठक बोलून बहुमत सिद्ध करण्यासाठी आदेश दिले होते. मात्र, त्यांना सिद्ध करता आले नाही. त्यांच्यासोबत अवघे चार नगरसेवक राहिले. जिल्हाधिकाऱ्यांसमोरील सुनावणीच्या वेळेस माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत आणि उषा राऊत यांनी प्रा. पाटील यांना गटनेते पदाला पाठिंबा असल्याचे म्हणणे सादर केले.
दोन्ही बाजूंची कागदपत्रे, गटनोंदणी, सदस्यांचे बहुमत आणि नियमांचा अभ्यास केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने गटनेते संतोष मेहेत्रे यांचे सर्व अपील फेटाळून लावत, प्रा. सतीश पाटील यांच्याकडे गटनेतेपद कायम ठेवण्याचा निर्णय दिला. राऊत यांच्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.
--------------
अमृत काळदातेंचा प्रयत्न
अमृत श्रीधर काळदाते यांनीही यापूर्वी एकदा गटनेते बदलण्यासाठी प्रयत्न केला होता. त्यांनी १७ एप्रिल २०२५ रोजी गट आणि उपगटनेता बदलण्यासाठी प्रस्ताव दाखल केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी विना कार्यवाही तो प्रस्ताव निकाली काढला होता. या निर्णयाविरोधात काळदाते यांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली होती. खंडपीठाने तीन आठवड्यांत या प्रस्तावावर निर्णय घेण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. जिल्हाधिकाऱ्यांसमोर झालेल्या सुनावणी वेळी नगरसेवकांनी प्रस्तावावरील सह्या नाकारल्या होत्या.
-----------
राम शिंदे यांचे विश्‍वासू
प्रा. सतीश पाटील विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचे विश्‍वासू आहेत, सर्वांच्या मदतीने ते नगरसेवकांची मोट बांधण्यात यशस्वी ठरले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Supreme Court hearing : कलम १९(c) वरून सुप्रीम कोर्टात खडाजंगी; सिब्बल यांच्या युक्तिवाद, त्यावर न्यायाधीशांचे प्रतिप्रश्न, वाचा नेमकं काय घडलं?

JSSC JE Paper Leak : झारखंडमधील पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; परीक्षा घेणाऱ्या एजन्सीच्या संचालकाला मुंबईतून अटक

Supreme Court: राष्ट्रीय महामार्गांवरील ढाब्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा हातोडा, कारवाईमागचं कारण काय?

माधुरी दीक्षितची एंट्री पण का बदलला 'कोण होणार करोडपती'चा होस्ट? सचिन खेडेकरांना सोनी मराठीने दाखवला बाहेरचा रस्ता?

Marathi News Live Updates : सुप्रीम कोर्टात आजची सुनावणी संपली, नेमकं काय घडलं? वाचा...

SCROLL FOR NEXT