माळेगाव, ता. ४ : माळेगाव बुद्रूक (ता. बारामती) येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील प्रा. जावेद आयमत हुसेन शेख यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. ‘निगराणी (सर्वेलन्स) उपयोगांसाठी विविध हवामान परिस्थितींमुळे खराब झालेल्या व्हिडिओंचे पुनर्संचयितीकरण’, या विषयावर त्यांनी आपला संशोधन प्रबंध सादर केला होता. या संशोधनकार्यासाठी प्रा. शेख यांना डॉ. शैलेन्द्रकुमार महादेव मुकणे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. शेख यांनी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जर्नल्स तसेच कॉन्फरन्समध्ये एकूण सहा संशोधन लेख प्रकाशित केले असून, त्यांच्या संशोधनकार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. प्रा. शेख यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.