Professor will pay one day salary for Coronavirus 
पुणे

Corona Virus : 'कोरोना'साठी प्राध्यापक देणार एक दिवसाचे वेतन 

सकाळवृत्तसेवा

पुणे: राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील प्राध्यापकांनी त्यांचे एक दिवसाचे वेतन 'कोरोना' आपत्तीच्या विरोधात लढण्यासाठी सरकारला मदत म्हणून दिण्याचा निर्णय घेतला अाहे. राज्यातील प्राध्यापकांच्या 'महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटीज अँड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन'ने (एमफुक्टो) या संघटनेने हा निर्णय घेतला. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
राज्यातील करोना विषाणू बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीसह विविध प्रतिबंधात्मक उपाय राबवण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी विविध क्षेत्रातील लोक शासनाच्या मदतीला धावून येत आहेत. 'एमफुक्टो' संघटनेनेही पुढाकार घेत , एमफुक्टोचे अध्यक्ष डॉ. तपती मुखोपाध्याय आणि सरचिटणीस डॉ. एस. पी. लवांडे यांनी एक दिवसाचे वेतन सरकारला देण्यासाठीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना  दिले आहे.

रेडी रेकनरचे दर 31 मे पर्यंत जैसे थे

राज्यातील ११ अकृषी विद्यापीठांमध्ये संघटनेचे सदस्य असलेले सुमारे ३० हजार प्राध्यापक कार्यरत आहेत. शासनाकडून प्राध्यापकांना एप्रिलमध्ये दिल्या जाणाऱ्या वेतनातून एक दिवसाचे वेतन वजा करून घेण्यात यावे असे संघटनेचे पत्रात नमूद केले आहे.

Corona Virus : प्रत्येक डाँक्टरांना मिळणार पीपीई किट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT