पुणे

#TeachingIssue प्राध्यापकांची दिवाळी; शिक्षकांवर मजुरीची वेळ 

सकाळवृत्तसेवा

पुणे : वरिष्ठ महाविद्यालयात तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात राज्य सरकारने नुकतीच वाढ केली आहे, तर दुसरीकडे कनिष्ठ महाविद्यालयात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या शिक्षकांचे मानधन 11 वर्षांपासून वाढलेले नाही. त्यामुळे हे शिक्षक प्रतितास 72 रुपयांनी काम करीत आहेत. परिणामी, एकाच शैक्षणिक संस्थेत वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक तुपाशी, तर कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक उपाशी, असे चित्र निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे काही शिक्षकांना अपुऱ्या मानधनामुळे सुटीच्या दिवशी शेतावर मजुरीही करावी लागत आहे. 

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहा हजारांपेक्षा जास्त प्राध्यापक-शिक्षक तासिका तत्त्वावर काम करीत आहेत. महाविद्यालयात प्राध्यापकांच्या जागा निर्माण झाल्यावर तेथे थेट नियुक्ती करण्यापेक्षा तासिका पद्धतीने शिक्षकांच्या नियुक्‍त्या करण्यास शैक्षणिक संस्था प्राधान्य देतात. कारण त्यात संस्थेचा आर्थिक फायदा जास्त होतो.

पुण्यात तर एका महाविद्यालयात तब्बल 37 शिक्षक वर्षानुवर्षे तासिका पद्धतीने काम करीत आहेत. या शिक्षकांच्या मानधनात दहा-बारा वर्षांपासून वाढ झालेली नाही. या शिक्षकांचे मानधन पूर्वी 20 रुपये प्रतितास होते. तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेतल्याने 2007 मध्ये त्यात वाढ झाली ती फक्त 50 रुपयांची. सध्या हे शिक्षक प्रतितास 72 रुपये मानधनावर काम करीत आहेत. मात्र, त्यानंतर कोणतीही वाढ झालेली नाही. 

काही वर्षांपासून शिक्षक भरती बंद असल्यामुळे त्याचा अतिरिक्त ताणही या शिक्षकांवर येत आहे. काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीचे निश्‍चित केले. मात्र, ही प्रक्रिया सुरू झाली नाही. अपुऱ्या संख्येमुळे तासिका तत्त्वावरील या शिक्षकांकडून अतिरिक्त काम करून घेतले जात आहे.

उच्च माध्यमिक परीक्षेचे पेपर तपासण्याचीही कामे ते करतात. महाविद्यालयाने सोपविलेली अन्य कामेही पार पाडतात. तरीही सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची भावना कनिष्ठ महाविद्यालयातील तासिका तत्त्वावरील शिक्षकांनी व्यक्त केली आहे. 

तासिका तत्त्वावर काम करणाऱ्यांचे प्रश्‍न : 
- नियमितपणे दरमहा पगार न होणे 
- अतिरिक्त कामाचा बोजा 
- तुटपुंजा मिळणारा पगार 
- शैक्षणिक वर्षाची ऑर्डर न मिळणे 

- मानधन : प्रतितास केवळ 72 रुपये 
- 11 वर्षांपासून मानधन वाढीची अपेक्षा 
- तासिका तत्त्वावर काम करणार शिक्षक ः सहा हजार 

कनिष्ठ महाविद्यालयातील तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांच्या मानधनात वाढीची मागणी राज्य सरकारकडे सातत्याने केली जात आहे. मागील महिन्यात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासमवेत बैठक झाली. त्या वेळी त्यांनी या शिक्षकांच्या मानधन वाढीसाठी अनुकूलता दर्शविली आहे. मात्र, अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही. 

- मुकुंद आंधळकर, सल्लागार सदस्य, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ 
 

शिक्षकांच्या प्रश्‍नांबाबत आपले मत कळवा... 
फेसबुक, टविटर, इन्स्टाग्राम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT