Professors make Smart Honeycomb Monitoring Device for beekeeping 
पुणे

मधमाशी पालनासाठी प्राध्यापकांनी बनविले ‘स्मार्ट हनिकोंब मॉनिटरिंग डिव्हाईस’

विद्यापीठातील डॉ. पंडित यांच्यासह अन्य दोन प्राध्यापकांचे संशोधन; उपकरणाला ‘पेटंट’ जाहीर

मीनाक्षी गुरव

पुणे - मधमाधी पालन करताना त्याची देखरेख अधिक चांगल्या पद्धतीने कशी करता येईल, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत असते. परंतु आता शेतकऱ्यांना या चिंतेपासून सुटका मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. होय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागातील प्राध्यापकांनी मधमाशी पालनात देखरेखीचे काम अधिक सुलभ होण्यासाठी ‘स्मार्ट हनिकोंब मॉनिटरिंग डिव्हाईस’ बनविले असून या उपकरणाला भारत सरकारने नुकतेच पेटंट जाहीर केले आहे.

विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागात कार्यरत असणारे प्राध्यापक डॉ. राधाकृष्ण पंडित यांच्यासह त्यांचे सहकारी मराठा विद्या प्रसारक समाजाच्या केटीएचएम महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विक्रम काकुळते आणि राजूर महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागाचे डॉ. बाळासाहेब टपले या तिघांनी ‘मधमाशी पालन’ विषयात संशोधन करत हे उपकरण विकसित केले आहे.

डॉ. पंडित म्हणाले, ‘‘मधमाशी पालन करताना त्याची देखरेख चांगल्या पद्धतीने करण्यासाठी या उपकरणाचा उपयोग होणार आहे. त्यासाठी उपकरणात कॅमेरे बसविले आहेत. मध गोळा करण्याच्या पारंपरिक पद्धतीमुळे मधमाश्यांच्या अनेक जंगली वसाहती नष्ट होतात. त्यामुळेच मधमाश्यांचे संगोपन हे पेट्यांमध्ये करून त्याद्वारे शास्त्रीय पद्धतीने मध गोळा करणे योग्य मानले जाते. मधमाश्या या परागीकरणाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका पार पाडतात. यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होते. अशा प्रकारचे उपकरण शेतात ठेवल्यास शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता वाढते. या उपकरणामध्ये कॅमेरे बसविले असल्याने मधमाशांचे सूक्ष्म निरीक्षण करणे शक्य होईल. मधमाशी विषयात अधिक संशोधन करणेही यामुळे शक्य होईल.’’

मधमाशांचे शत्रूपासून रक्षण करत त्यांची संख्या वाढविण्यादृष्टीने हे उपकरण महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचेही डॉ. पंडित यांनी सांगितले. डॉ. पंडित यांना एकूण २९ वर्षांचा अध्यापनाचा व संशोधनाचा अनुभव आहे. त्यांनी बेडकाच्या नवीन प्रजातीचा शोध लावला असून त्यांचा याबाबत शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. डॉ. पंडित हे विद्यापीठाच्या अधिसभेचेही सदस्य आहेत.

‘‘या उपकरणामुळे मधमाशी पालनातील उत्पादन क्षमता वाढणार आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकणार आहे. आता या उपकरणाला ‘पेटंट’ जाहीर झाल्यामुळे त्याचे व्यावसायिक उत्पादन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी लवकरच पावले उचलली जाणार आहेत.’’

- डॉ. राधाकृष्ण पंडित, प्राणिशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT