प्रगत माध्यमिक विद्यालयाचा ८९ टक्के निकाल
अहिल्यानगर, ता. ८ ः दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ८९.०४ टक्के लागला. निधी अविनाश इप्पलपेल्ली हिने (८३.२० टक्के) प्रथम, ममता नवराम चौधरी हिने (८०.२० टक्के) द्वितीय, तर वैष्णवी पांडुरंग चोथे हिने (७४ टक्के) गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.
संस्थेच्या अध्यक्षा विजया रेखे, सचिव किरण वैकर, उपाध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी, खजिनदार उमेश रेखे, माजी अध्यक्ष दि. ना. जोशी, कार्यकारी सदस्य महेश रेखे, उदयकुमार भणगे, उमेश नगरकर, तसेच विद्यालयाचे प्राचार्य सुनील पंडित यांनी अभिनंदन केले, तसेच संस्थेचे सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.