vijaystambh sakal
पुणे

पुणे : विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश

अफवा, जातीय द्वेष पसरविणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून २ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत कलम १४४ अनुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. कोणतीही व्यक्ती इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक अशा समाजमाध्यमांद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरविणारे खोटे संदेश, खोटी माहिती पोस्ट करणार नाहीत.(article 144)

तसेच फॉरवर्ड करणार नाहीत, याची जबाबदारी संबंधित व्यक्ती आणि ग्रुप ॲडमिनची असेल. शहर आयुक्तालयामधील गावांमध्ये स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या लेखी परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग लावण्यास प्रतिबंध राहील. यात सरकारी विभाग आणि यंत्रणांना सवलत राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असे पोलिस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी आदेशात नमूद केले आहे.(Pune news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy: पृथ्वी शॉ झाला महाराष्ट्राचा कर्णधार! ऋतुराज गायकवाडला संघात स्थान का नाही? पाहा संपूर्ण टीम

Satara Girl Death : सेकंदाच्या रागात उद्ध्वस्त झालं कुटुंब! साताऱ्यात शिक्षक बापानं 17 वर्षाच्या पोरीला क्रिकेटच्या बॅटनं संपवलं; मृत्यूनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

पुण्यातील 'या' ठिकाणी झालेलं माहेरची साडी सिनेमाचं शुटिंग, सिनेमातील घर आठवतय का? अजूनही गाजलेलं शूटिंग लोकेशन!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर पदवीधरमधून सतीश चव्हाण यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर

Kalika Mata Tradition: माते, काही चूक झाली असेल तर माफ कर’; येरोळमध्ये कालिका मातेला गावात आणण्यासाठी अनोखी परंपरा, नेमकी काय आहे परंपरा?

SCROLL FOR NEXT