Online
Online 
पुणे

प्रोजेक्‍ट, इंटर्नशीप नावलाच! कामाचा अनुभव मिळेना, ऑनलाइन समजेना!

ब्रिजमोहन पाटील

पुणे - 'ऑगस्ट महिन्यात माझे चौथ्या वर्षाचे क्‍लास सुरू झाल्यानंतर प्रोजेक्‍ट करा असे सांगितले जात आहे, पण आम्हाला प्रोजेक्‍टवर चर्चा करण्यासाठी भेटता येत नाही, प्राध्यापकांनी व्हिडिओ पाठवला तरी त्यातून काही पूर्ण समजत नाही, घरात बसून सॉफ्टवेअर उपलब्ध होत नाहीत, अशी अनेक अडचणी येत असल्याने प्रोजेक्‍ट केवळ औपचारिकता झाली आहे.'' असे मृणाल देशमुख सांगत होती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'कोरोना'मुळे महाविद्यालयांना टाळे लागलेले आहे. प्राध्यापक वर्क फ्रॉम होम करत आहेत, अत्यावश्‍यक काम असेल तरच महाविद्यालयात बोलविले जाते. सकाळ, दुपार, संध्याकाळ अशी सत्रांमध्ये विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. अजून किती दिवस असे चालणार याचे उत्तर अद्याप कोणाजवळच नाही. मात्र, याचा फटका अभियांत्रिकी, आर्किटेक्‍चर, फार्मसी यासह इतर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना बसला आहे.

पदवी किंवा पदव्युत्तर पदवीच्या शेवटच्या वर्षात विद्यार्थ्यांना प्रोजेक्‍ट, इंटर्नशीप हे महत्त्वाचे असतात. वेळेमध्ये प्रोजेक्‍ट पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना धडपडावे लागते. त्यांनी केलेल्या कामाचा, आलेल्या अनुभवाचे थिसेस लिहून काढण्याचे मोठे काम असते. तर आर्किटेक्‍चर पाचव्या वर्षात गेलेल्या विद्यार्थ्यांना सहा महिन्यांची इंटर्नशीप करणे अनिवार्य असते. त्याचे गुण महत्त्वाचे ठरतात, पण यंदा कोरोनामुळे नियोजन बिघडले आहे.

आर्किटेक्‍चर करणारा शशांक पाटील म्हणाला, 'एप्रिल महिन्यात मी इंटर्नशीपला बेंगलोरला जाणार होते. सर्व प्रक्रिया पार पाडली होती. पण मार्च महिन्यात कोरोना सुरू झाला आणि माझी संधी गेली. त्यानंतर आता मी पुण्यात एका आर्किटेक्‍चरकडे काम करत आहे. माझे काही मित्र गावाकडे आहेत, ते ऑनलाइन काम करत आहेत. आमचे काम थेट फिल्डवर जाणून करण्याचे आहे, पण घरातून काम करताना फिल्डचा काहीच अनुभव मिळत नाही. ही केवळ औपचारिकता झाली आहे.''

दरवर्षी मी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना प्रोजेक्‍टसाठी मार्गदर्शन करतो. यंदाही अनेक मुलांना गाइड करत आहे, पण मी पाठवलेल्या व्हिडिओ मधून प्रोजेक्‍ट करताना अडथळे निर्माण होतात. त्यांना किती समजले आहे देखील कळत नाही. ऑनलाइन प्रोजेक्‍ट करताना विद्यार्थ्यांना महाविद्यालयात असणारी साधणे, वर्कशॉप, सॉफ्टवेअर याचा वापर करता येत नसल्याने त्यात तोटा होत आहे. यातून अनेक विद्यार्थी रेडिमेड प्रोजेक्‍ट विकत घेऊन सादर करण्याची शक्‍यता वाढत आहे.''
- भूषण महाजन, प्रोजेक्‍ट मार्गदर्शक

'आर्किटेक्‍चर, पदव्युत्तर अभियांत्रिकी, फार्मसी, एमएससी यासह इतर अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना अनुभव मिळावा यासाठी प्रोजेक्‍ट, इंटर्नशीप करण्यासाठी महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर नियोजन केले आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांवर मर्यादा आल्याने हवे तसे काम करता आले नाही. ज्या विद्यार्थ्यांना फिल्डवर्क करण्याची संधी मिळाली नसली तर पुढच्या काळात ही संधी उपलब्ध होऊ शकते.''
- डॉ. मनोहर चासकर, अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान, पुणे विद्यापीठ

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : मॉन्सून अंदमानमध्ये दाखल! ‘एल निनो’ची तीव्रता कमी होत असल्याचे निरीक्षण

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Parli Bogus Voting Video : परळीतल्या बोगस मतदानाच्या क्लिप व्हायरल; रोहित पवारांचे गंभीर आरोप, म्हणाले...

SCROLL FOR NEXT