पुणे

पिंपरी कॉलेज कट्टा

CD

प्रोजेक्ट सीड टू शेड उपक्रम
(डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, आकुर्डी)
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या शिक्षण, समाजसेवा, नेतृत्व, राष्ट्रनिर्माण आणि शाश्वत विकासाच्या दूरदृष्टीला अभिवादन करण्यासाठी व्हीजन टू ॲक्शन मंथ’ उपक्रम सुरू केला. डॉ. डी. वाय. पाटील ॲग्रीबिझनेस करिअर एम्पॉवरमेंट फोरम, ‘सकाळ यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) व ज्ञानदीप ॲकॅडमी यांचे सहकार्य लाभले. प्रभारी प्राचार्य डॉ. मच्छिंद्र जगताप, उपप्राचार्य डॉ. एस. एन. पाटील, प्रा. दिग्विजय पवार यांच्या समन्वयातून आणि एसीई फोरमचे चेअरमन राजवर्धन एस. ए. करांडे यांच्या संकल्पनेतून उपक्रम सुरू केला. डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ॲड. महेश शिंदे यांनी यूपीएससी पूर्वपरीक्षेतील बदलती प्रश्नपद्धती, वाढती कठीणता, वाचनगती आणि आकलनक्षमता यांचे महत्त्व सांगितले. शुभम तिजारे (सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा) आणि मानतेश पाटील (उपजिल्हाधिकारी) यांनी मार्गदर्शन केले. वक्तृत्व स्पर्धा, रक्तदान व आरोग्य जनजागृती शिबिर, पर्यावरण संवर्धन उपक्रम राबविण्यात येणार आहे. ‘प्रोजेक्ट सीड टू शेड’ उपक्रमात देशी वृक्षांच्या बियांचे रोपण केले जाणार आहे. सूत्रसंचालन ‘यिन’ उपाध्यक्षा धनश्री निखाडे यांनी केले. ‘यिन’चे माजी मंत्री राजवर्धन करांडे यांनी आभार मानले.

‘इन्साइट’ राष्ट्रीय परिषद
(एमआयटी आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, आळंदी)
एमआयटी आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज आळंदी येथील स्टुडंट अफेअर्सतर्फे संशोधन व विकास कमिटीच्या सहकार्याने ‘इन्साइट’ बहुविद्याशाखीय राष्ट्रीय परिषद ऑनलाइन आयोजित केली आहे. ‘इनोव्हेट, सेक्यूर, अनालाइझ, ट्रान्सफॉर्म’ असे परिषदेचे घोषवाक्य आहे. संशोधक, अभियंते विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान, विश्लेषण, सुरक्षा आणि व्यवसाय नवोपक्रम या क्षेत्रांतील संशोधन सादर करतील.
परिषदेत संगणकशास्त्र, गणित, सांख्यिकी व इलेक्ट्रॉनिक्स, सायबर सुरक्षा व डेटा सायन्स आणि वाणिज्य व व्यवस्थापन अशा चार विषयांतर्गत शोधनिबंध सादर करता येतील. परिषदेचे संयोजन डॉ. सुनील महाजन, डॉ. कीर्ती रासकर आणि शीतल शेवकरी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder: 1 ऑक्टोबरपासून 'एलपीजी'बाबतच्या नियमांमध्ये मोठे बदल; 'या' ग्राहकांना मिळणार नाही लाभ

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये ट्रॅक्टर वेल्डिंगवेळी स्फोट, चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Dharashiv News : आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांनी धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा केला पाहणी दौरा; शेतकऱ्यांनी अत्यंत पोटतिडकीने आपल्या व्यथा मांडल्या

Police Commissioner Amitesh Kumar : ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई; वेळेपेक्षा भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य

Karad Ganpati Visarjan : कऱ्हाडच्या मिरवणुकीत दिसली बदलाची चाहूल; डीजेच्या दणदणाटापेक्षा वाद्यांचा गजर, गुलालएेवजी खुलला भक्तीचा रंग

SCROLL FOR NEXT