Sada_Dumbre
Sada_Dumbre 
पुणे

विचारवंत, लेखक, अभ्यासू पत्रकार गमावला; सदा डुंबरे यांना श्रद्धांजली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : साप्ताहिक सकाळचे निवृत्त संपादक सदा डुंबरे यांच्या निधनाने आपण एक तर्कसंगत विचारवंत (रॅशनल थिंकर), लेखक, अभ्यासू पत्रकार आणि ज्येष्ठ संपादक गमावला, अशा भावना सदा डुंबरे यांच्या श्रद्धांजली सभेत विविध वक्त्यांनी व्यक्त केल्या.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने सोमवारी (ता.१) सदा डुंबरे यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळचे माजी संपादक एस. के. कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार जयरामबापू देसाई, अरुण खोरे, सकाळचे निवासी संपादक रमेश डोईफोडे, साप्ताहिक सकाळचे कार्यकारी संपादक माधव गोखले, माजी आमदार जयदेव गायकवाड आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

एस. के. कुलकर्णी म्हणाले, ‘‘सकाळचे संस्थापक डॉ. ना. भी. परुळेकर यांच्या निधनानंतर सकाळच्या संपादकीय विभागाची जबाबदारी श्री. ग. मुणगेकर आणि माझ्यावर आली. परुळेकर यांच्यानंतर सकाळ चालेल की नाही, याची आम्हालाच खात्री नव्हती. परंतु आम्ही त्यावेळी सदा डुंबरे, प्रकाश जोशी आणि अनिल टाकळकर या तीन नवख्या तरुणांना अगदी अत्यल्प पगारात संधी दिली. यापैकी डुंबरे यांनी अभ्यास आणि वाचन वाढवून स्वतःला सिद्ध करून दाखवले. या तिघांनी जीव ओतून काम केले. या आमच्या टीमने हळूहळू सकाळ वाढवत नेला. त्यानंतरच्या दोन वर्षात सकाळ स्थिर झाला. डुंबरे हे माझ्यापेक्षा वयाने लहान होते. ते अचानक गेले. अशा या वयाने लहान असलेल्या सहकाऱ्याला श्रद्धांजली वाहण्याची वेळ येईल, असे वाटले नव्हते.’’

डुंबरे यांच्या निधनाने साहित्य शिवार या नियतकालिकाचा मार्गदर्शक गमावल्याची भावना जयरामबापू देसाई यांनी, तर डुंबरे हे एक तर्कसंगत विचारवंत होते, अशी भावना माजी आमदार जयदेव गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केली. अरुण खोरे, प्रा. उज्ज्वला बर्वे, प्रा. संजय तांबट, माधव गोखले, निरंजन आगाशे यांनीही यावेळी डुंबरे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

सकाळचे माजी संपादक विजय कुवळेकर, आनंद आगाशे, ज्येष्ठ पत्रकार अनिल टाकळकर आणि किरण ठाकूर यांनी शोकसंदेश पाठवले होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांनी या शोकसंदेशाचे वाचन केले. डुंबरे यांच्या पत्नी शुभांगी आणि मुले ही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सहभागी झाले होते. सदा डुंबरे यांचे २५ फेब्रुवारीला निधन झाले होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौसमोर मुंबईनं नांगी टाकली; 5 षटकात 4 फलंदाज तंबूत

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT