property tax pmc discount 2 august expand date ajit deshmukh pune sakal
पुणे

PMC Property Tax : मिळकतकराची सवलतीसाठी २ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ - अजित देशमुख

मिळकतकराची सवलत घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस असताना महापालिकेचे संकेतस्थळ क्रॅश

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मिळकतकराची सवलत घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस असताना महापालिकेचे संकेतस्थळ क्रॅश झाल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत. त्याचा फटका नागरिकांना बसल्याने ही सवलत २ ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आली आहे. मिळकतकर विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांनी ही माहिती दिली.

पुणे महापालिकेतर्फे नागरिकांना १५ मे ते ३१ जुलै या अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये निवासी मिळकत करावर पाच ते दहा टक्के सूट देण्यात आलेली आहे. गेल्या अडीच महिन्यात महापालिकेला सुमारे अकराशे कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न यामधून मिळालेली आहे.

आज या सवलतीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे कर भरणा करण्यासाठी नागरिकांची गडबड सुरू आहे. ऑनलाइन माध्यमातून तसेच क्षेत्रीय कार्यालयातील नागरी सुरुवातीला सुविधा केंद्र मध्ये जाऊन नागरिक कर भरत आहेत.

सकाळी दहा वाजता क्षेत्रीय कार्यालय सुरू झाल्यानंतर लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. मात्र एकाच वेळी अनेक नागरिक संकेतस्थळावर कर भरत असल्याने महापालिकेची ऑनलाईन यंत्रणा कोलमडून गेली आहे.

संकेतस्थळ सुरू होत नसल्याने नागरिकांना कर भरता येत नाही. त्याचप्रमाणे अनेक नागरिक नागरिक सुविधा केंद्रांमध्ये जाऊन रांगेमध्ये उभे आहेत पण येथील यंत्रणा देखील बंद पडली आहे त्याचा फटका बसला आहे.

गेल्या वर्षी देखील शेवटच्या दिवशी कर भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेली होती. त्यामुळे महापालिकेची ऑनलाईन यंत्रणा पडून गेली होती. त्यानंतर दोन दिवस मुदतवाढ देण्यात आलेली होती. यंदाच्या वर्षी देखील महापालिकेची ऑनलाईन यंत्रणा क्रॅश होण्याची नामुष्की व धावलेली आहे.

सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ऑनलाइन यंत्रणा बंद पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा असल्याने त्यांच्या मार्गाची तपासणी सुरू आहे त्यामुळे शहरात सर्वत्र वाहतूक कोंडी आहे त्याचाही फटका अनेक नागरिकांना बसला नागरिकांची झालेली अडचण लक्षात घेऊन मिळकतकराची सवलतीसाठी २ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

मिळकतकर विभागाचे प्रमुख अजित देशमुख म्हणाले,"महापालिका हद्दीतील मिळकतधारकांना३१ जुलै पर्यंत संपूर्ण मिळकतकर भरल्यास करावर ५ किंवा १० टक्के सवलत देण्यात आली होती. परंतु आज अखेरच्या दिवशी काही तांत्रिक

कारणास्तव मिळकतकर भरणा काही कालावधीसाठी बंद झाला होता. मिळकतधारकांची व लोकप्रतिनिधींच्या मागणीचा विचार करता मिळकतकर सवलतीमध्ये भरण्याची मुदत २ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच लॉटरी योजनेचा कालावधी देखील २ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT