property tax esakal
पुणे

Property Tax : मिळकतकर सवलतीची आज मुंबईमध्ये बैठक

मिळकतकरातील ४० टक्क्यांच्या सवलतीबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. १७) मुंबईत बैठक होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मिळकतकरातील ४० टक्क्यांच्या सवलतीबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. १७) मुंबईत बैठक होणार आहे.

पुणे - मिळकतकरातील ४० टक्क्यांच्या सवलतीबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. १७) मुंबईत बैठक होणार आहे. त्यातील निर्णयानुसार पुणेकरांना दिलासा मिळणार की आणखीन वाट पाहावी लागणार, हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान पुणेकरांना पूर्वीप्रमाणेच ही सवलत कायम ठेवावी, अशी मागणी शहर कॉंग्रेसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

मिळकतकरात ४० टक्के तर देखभाल-दुरुस्तीत १५ टक्क्यांची सवलत दिली जात होती. मात्र, २०१८ मध्ये देखभाल-दुरूस्तीतील पाच टक्के आणि मिळकतकरात ४० टक्के सवलत सरकारने रद्द केली. याबाबत ‘सकाळ’ने सर्वप्रथम आवाज उठविला होता.

मिळकतकर आकारणीचे वाजवी दर ठरविण्याचे आणि इतर करांची टक्केवारी ठरविण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत. ते कमी करण्याचे आदेश आयुक्तांना द्यावेत, अशी मागणी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि अभय छाजेड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT