sakal
पुणे

प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे प्रस्ताव शासनाला उद्याच पाठवणार

पुर्वहवेलीतील १६ गावांतील बाधित शेतकऱ्यांचे प्रस्ताव शासनाला पाठविण्यात येणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली असल्याची माहिती आमदार अशोक पवार यांनी दिली

शरद पाबळे

केसनंद : पुर्वहवेलीत भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या लाभक्षेत्रात न येणाऱ्या जमिनी तातडीने वगळाव्यात, या मागणीसाठी शिरुर-हवेलीचे आमदार ॲड. अशोक पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या पाठपवुराव्यानंतर उद्याच (ता. २८) पुर्वहवेलीतील १६ गावांतील बाधित शेतकऱ्यांचे प्रस्ताव शासनाला पाठविण्यात येणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली असल्याची माहिती आमदार अशोक पवार यांनी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

भामा आसखेड प्रश्नी आज सायंकाळी आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पुर्वहवेलीतील बाधित शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचा आग्रह धरला. यावेळी उद्याच संबंधित सर्व शेतकऱ्यांचे प्रस्ताव शासनाला पाठविण्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. या शिष्टमंडळात योगेश शितोळे, रामदास शिंदे, सतीश मोरे राजेंद्र वारघडे आदींसह निवडक पदाधिकारी व शेतकऱ्यांचा समावेश होता.

पूर्व हवेलीतील १६ गावांना पाणी देऊ शकत नसल्याने लाभक्षेत्रात न येणाऱ्या शेतकऱ्यांचे क्षेत्र वगळावे, ही येथील शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे. याबाबत वेळोवेळी शेतकरी आंदोलनेही झालेली आहेत. मात्र अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याने शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात होते. याबाबत आमदार पवार यांची आग्रही भुमिका लक्षात घेवून हे सर्व प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असल्याची माहिती शिष्टमंडळातील शेतकऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT