hc.jpg 
पुणे

प्रस्तावित एचसीएमटीआर मार्गात आणखी तीन ठिकाणी बदल

सकाळवृत्तसेवा

पुणे : शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित असलेल्या "एचसीएमटीआर' (उच्च द्रुतगती वर्तुळाकार महामार्ग) मार्गात आणखी तीन ठिकाणी बदल करण्याच्या प्रस्तावास शहर सुधारणा समिती बैठकीत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. 

एचसीएमटीआर हा पुणे महापालिकेने हाती घेतलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक आहे. प्रस्तावित मार्ग हा सुमारे छत्तीस किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गासाठी सुमारे पाच हजार कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. या खर्चाचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध पर्यायांचा विचार केला जात आहे. या कामाच्या निविदा जादा दराने आल्याने ही प्रक्रिया रखडली आहे. 
दरम्यान या मार्गासाठी जागा ताब्यात घेण्यासाठी संयुक्त मोजणीला महापालिकेकडून नुकतीच संयुक्त मोजणी करून घेण्यात आली.

दरम्यान, या मार्गाकरीता संरक्षण विभागाच्या जागा सोडून मोजणी करण्यात आली. त्याचे नकाशे ही महापालिकेला प्राप्त झाले आहेत. त्यातून या मार्गासाठी महापालिकेला प्रत्यक्षात किती जागा हवी हे आता स्पष्ट होणार आहे. त्यातून आवश्‍यक त्या जागेपैकी ऐंशी टक्के जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. 

मध्यंतरी या प्रस्तावित मार्गात बारा ठिकाणी बदल करण्याचा विषय सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला होता. तेव्हा वाद निर्माण झाले होते. मात्र सत्ताधारी पक्षाने बहुमताच्या जोरावर त्यास मान्यता दिली होती. या बदलावर दाखल झालेल्या हरकती सूचनांवर सुनावणीचे काम सुरू आहे. असे असताना आता आणखी तीन ठिकाणी मार्गात बदल केला जाणार आहे. याबाबतचे प्रस्ताव शहर सुधारणा समिती समोर ठेवण्यात आला होता. यामध्ये कर्वेनगर येथील गांधी लान्स ते अलंकार चौकी, वडगाव शेरी आणि लोहगाव भागांत हा बदल केला जाणार आहे. या बदलास आज समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Government Land: पुणे जिल्ह्यात शासकीय जमिनींचा शर्तभंग; ३३० प्रकरणे उघड, ३५० कोटींच्या ३० ते ४० जागा शासनजमा

1980s चा ट्रेंड फॉलो केला... पण तेव्हाचा हा वादळी राजकीय किस्सा वाचा... सत्ता, पराभव, जेल अन् इंदिरा गांधींचं कमबॅक

Maharashtra Cooperative Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ठेवींना मोठा फटका; वर्षभरात ६,३५० कोटींची घट, एनपीए ८.४४ टक्क्यांवर

US Open: झ्वेरेव सलग चौथ्यांदा ग्रँडस्लॅमच्या सेमीफायनलमध्ये; फायनलच्या तिकिटासाठी कोणाविरुद्ध होणार लढती?

Engineering Student: आजी, मम्मी, पप्पा... सॉरी!’ अभियांत्रिकीच्या २२ वर्षीय विद्यार्थ्याने संपवले जीवन; ‘छोटीला चांगले शिकवा...’ अशी चिठ्ठी

SCROLL FOR NEXT