Ajit Pawar  sakal
पुणे

प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पुणे जिल्ह्यातच होईल - अजित पवार

पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी पवार पुण्यात आले होते. कोरोना आढावा बैठक संपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी पवार पुण्यात आले होते. कोरोना आढावा बैठक संपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

पुणे - पुणे जिल्ह्यात (Pune District) याआधी प्रस्तावित करण्यात आलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ (International Airport) हे पुणे जिल्ह्यातच होईल. पण ते नेमके कोणत्या ठिकाणी होईल, त्याची जागा कोणती हे आताच सांगणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शनिवारी (ता.१५) पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी पवार पुण्यात आले होते. कोरोना आढावा बैठक संपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेबाबत तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे आता हे विमानतळ होणार की नाही, असा लोकांमध्ये संभ्रम आहे, असा प्रश्‍न पवार यांना विचारला असता त्यांनी हा निर्वाळा दिला आहे.

पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबतचे अनेक वर्षांपासून भिजत घोंगडे कायम आहे. पूर्वनियोजनानुसार हे विमानतळ खेड तालुक्यात होणार होते. परंतु तेथील स्थानिकांनी विमानतळासाठी आवश्‍यक असणारी जागा देण्यास नकार दिला. या विमानतळाला आंदोलनाच्या माध्यमातून तीव्र विरोध केला. त्यामुळे सरकारने या विमानतळाची जागा बदलण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार हेच विमानतळ पुरंदर तालुक्यात हलविले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावित विमानतळाचे छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरणही जाहीर केले आहे.

खेड तालुक्यातील शेतकऱ्यांप्रमाणेच पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांनीही या विमानतळाला जमिनी देण्यास प्रथमपासून तीव्र विरोध सुरु केला आहे. या विरोधामुळे तेथील जागेबाबत तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. ही अडचण दूर करण्यासाठी काही अंशी जागा बदलण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दिला होता. परंतु हा प्रस्ताव तांत्रिक अडचणीमुळे अद्याप मंजूर होऊ शकला नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित विमानतळ जागेअभावी होणार की नाही, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मात्र काहीही झाले तरी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे जिल्ह्यातच होईल आणि याचा फायदा नगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातरा, सोलापूर आदी जिल्ह्यांसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना होऊ शकेल, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT