पुणे

मुळशीची बदनामी थांबविण्याची समन्वयक समितीची मागणी

CD

कोथरूड, ता. ३ ः मुळशी नावाचा नकारात्मक वापर रोखण्यासाठी संघटित झालेल्या मुळशी बचाव समन्वयक समितीने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेऊन ‘मुळशीची बदनामी थांबवावी’ यासाठी निवेदन दिले.

आगामी काळात येणाऱ्या कोणत्याही चित्रपटांमध्ये, वेब सिरीजमध्ये अथवा व्यावसायिक कलाकृतींमध्ये ‘मुळशी’ या नावाचा नकारात्मक किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी दर्शवण्यासाठी वापर करू नये, मुळशी तालुक्याच्या हद्दीमध्ये कोणत्याही चित्रपटाचे, मालिकेचे किंवा व्यावसायिक चित्रीकरण करण्यापूर्वी ‘मुळशी बचाव समन्वय समिती’ची पूर्वपरवानगी व ना-हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात यावे, जेणेकरून तालुक्याची संस्कृती आणि प्रतिमेला धक्का पोहोचणार नाही याची खात्री केली जाईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मुळशी तालुक्याला वारकरी संप्रदाय, स्वातंत्र्य चळवळ, सत्याग्रह, शिक्षण, शेती, उद्योग, सामाजिक कार्य, क्रीडा आणि सांस्कृतिक परंपरेचा समृद्ध वारसा आहे. मात्र अलीकडच्या काळात ‘मुळशी पॅटर्न’ किंवा ‘मुळशी’ या शब्दाचा वापर गुन्हेगारी, दहशत, बेकायदा कृत्ये किंवा नकारात्मक घटनांसाठी व्यावसायिक चित्रपटांमध्ये सर्रास केला जात आहे. यामुळे मुळशी तालुक्याची आणि मुळशीकरांची सामाजिक प्रतिमा मलिन होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘मुळशी बचाव समन्वय समिती (अराजकीय)’ स्थापन करून मुळशीची खरी ओळख आणि अस्मिता जपण्यासाठी लोकशाही व कायदेशीर मार्गाने प्रयत्न सुरू केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकीची मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टीका, नेत्याला मंत्रिपद गमावण्याची वेळ

Curtly Ambrose : त्याने विकेट घेतली की आई घराबाहेर घंटा वाजवायची! २१ व्या वर्षी क्रिकेटला सुरुवात केलेला तो जगातील महान गोलंदाज बनला

Koyana Dam : महाराष्ट्रासह कर्नाटकातील कृष्णाकाठला मोठा दिलासा! कोयना धरण शंभर टक्के भरले, १०५.२५ टीएमसी पाणीसाठा पूर्ण

Life Horoscope: दीर्घायुष्य लाभलेल्या असतात ‘या’ राशीच्या व्यक्ती; आयुष्यात कितीही त्रास आला तरी लढण्याची ताकद कायम, तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : विभागीय आयुक्त कार्यालयात सुनेत्रा पवारांची बैठक सुरु

SCROLL FOR NEXT