निरगुडसर, ता. २० ः मंचर- लोणी रस्त्यालगत जारकरवाडी (ता. आंबेगाव) गावाच्या हद्दीत असलेल्या धोकादायक विहिरीला जाळी बसवल्याने रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह अंगणवाडीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांचा प्रवास सुरक्षित बनला आहे.
मंचर- लोणी हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. परंतु, याच मार्गावर जारकरवाडी येथे रस्त्यालगत असलेली विहीर प्रवाशांसाठी धोकादायक बनली होती. तसेच, अवघ्या २०० ते ३०० फुटावर अंगणवाडीत लहान मुले शिक्षण घेत आहेत. याबाबत येथील नागरिकांनी पारगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांच्याकडे विहिरीला संरक्षक जाळी बसवण्याची मागणी केली होती. कांडगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून विहिरीला संरक्षक जाळी बसवून घेतली आहे. यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
03286
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.