बेकायदेशीर उद्योगांविरोधात उपोषण
अहिल्यानगर, ता. १४ ः एमआयडीसी परिसरात प्लास्टिक मोल्डिंग करणारी कारखाने गेल्या दोन ते तीन वर्षांपासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाकडील परवानग्याही न घेता सुरू आहे. या कारखान्यांची चौकशी करावी, अशी मागणी विलास कुऱ्हाडे, आकाश मैत्रा, गणेश भागवत, सागर दगडे, सौरभ हालदार, नौशाद हुसेन, प्रभास मैत्रा, सूरज सिंग, चिरंजीव गाढवे, किरण शिंदे आदींनी केली आहे.
एमआयडीसीमध्ये काही कारखाने आवश्यक परवानगी न घेता सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे कामगारांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. संबंधित कारखान्यांमध्ये शिसे संबंधित काम होत आहे. अनेक कामगारांच्या रक्तामध्ये शिसेचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, नियमित वैद्यकीय तपासणी केली जात नसून काही अधिकारी तपासणी टाळत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. कामगारांना हातपाय सुजणे, पोटदुखी यांसारख्या तक्रारी असूनही योग्य उपचार व सहकार्य मिळत नसल्याचा आरोप आहे. दूषित मास्क व साहित्य खुलेआम फेकले जाते. यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पर्यावरणाला धोका निर्माण करणाऱ्या कारखान्यांची चौकशी करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.