protest against municipal corporation in baner over traffic jam pune sakal
पुणे

Baner News : बाणेर येथे महापालिका प्रशासनाविरोधात भरपावसात आंदोलन

amol balwadkar strike along with citizen |निवेदन स्वीकारण्यासाठी सक्षम अधिकारी न आल्याने निवेदन जाळून महापालिकेचा निषेध

शीतल बर्गे

बालेवाडी : बाणेर येथील राधा चौकात बाणेर, बालेवाडी, सुस, महाळुंगे आणि पाषाण येथील वाहतूक कोंडीची समस्या, रस्ते खड्डे मुक्त करा, चौकाचौकातून वॉर्डनची नेमणूक करा अशा असंख्य मागण्यांसाठी भर पावसात या भागातील नागरिकांसमवेत मा. नगरसेवक अमोल बालवडकर यांनी महापालिका प्रशासना विरोधात आंदोलन केले. यावेळी मुसळदार पाऊस असूनही शंभर पेक्षा अधिक नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी झाले.

गेल्या दीड-दोन वर्षांपासून बाणेर बालेवाडी सुस् , महाळुंगे, पाषाण या भागातील नागरिकांना वाहतूक कोंडी ,रस्त्यांवरील खड्डे, पर्यायी रस्त्यांच्या रखडलेली कामे यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत, तासन् तास नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे.

यामुळे नागरिकांचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य बिघडत आहे . यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही प्रशासन नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याने मा. नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीने बाणेर येथील राधा चौकात बैलगाडी आणून ,हलगी वाजवून प्रशासनाच्या विरोधात भर पावसात घोषणा देत आंदोलन करण्यात आले.

येथे परिसरातील अनेक सोसायट्यांचे प्रतिनिधी, महिला , नागरिक उपस्थित होते . त्यांनी आपल्याला भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढाच येथे वाचून दाखविला. आंदोलनादरम्यान प्रशासनाने आंदोलनाकडे दुर्लक्ष करत निवेदन स्वीकारण्यास सक्षम अधिकारी न पाठविल्याने या ठिकाणी निवेदन जाळून महापालिकेचा निषेध करण्यात आला. यावेळी पोलिसांच्या माध्यमातून मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

आंदोलनकर्त्यांच्या मागण्या

  • परिसरामध्ये रस्ते खड्डेमुक्त करा.

  • ट्रॅफिक वॉर्डन ची नेमणूक करा. * सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करा. *बॅरिकेड्स बसवा.

  • या भागांत मुंबई बंगलूर महामार्गाजवळ नवीन अंडर पास तयार करा

  • सेवा रस्ता सुधारणा करा. *बालेवाडी वाकड रस्ता लवकरात लवकर सुरू करा

  • महाळुंगे नांदे रस्त्याची सुधारणा करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT