protest of baramati womens on ram kadams statement
protest of baramati womens on ram kadams statement  
पुणे

बारामतीतील महिलांचा राम कदमांच्या वक्तव्यावर जोडे मारुन निषेध

सकाळवृत्तसेवा

बारामती शहर - मुलींना पळवून आणण्याची भाषा करणाऱ्या आमदार राम कदम यांचे आज बारामतीतील महिलांनी रावण कदम असे प्रतिकात्मक नामकरण करत निषेध नोंदविला. 

'राम्या कदम हाय हाय....राम्या तुझ करायच काय....खाली डोक वर पाय..' अशा घोषणांनी आज राष्ट्रवादीच्या महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी आमदार राम कदम यांचा निषेध केला. राम कदम यांच्या प्रतिमेस जोडे मारुन निषेध व्यक्त केला गेला. 

आज प्रशासकीय भवनाबाहेर राष्ट्रवादीच्या तालुका महिलाध्यक्ष वनिता बनकर, शहराध्यक्षा अनिता गायकवाड, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, आरती शेंडगे, नगरसेविका नीलीमा मलगुंडे, अनिता जगताप, मयूरी शिंदे, शामल जगताप, दीपाली पवार, ज्योती जाधव, रेश्मा ढोबळे, राष्ट्रवादीचे शहर युवकाध्यक्ष अमर धुमाळ, समीर चव्हाण, बाळासाहेब चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नायब तहसिलदारांना निवेदन देत राम कदम यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली. या प्रसंगी वनिता बनकर, आरती शेंडगे यांनी राम कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT