तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे आमदार ऍड. अशोक पवार याना निनावी पत्राद्वारे धमकी दिल्याबद्दल सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला. sakal
पुणे

तळेगाव ढमढेरे : आमदारांना पत्राद्वारे धमकी दिल्याबद्दल निषेध मोर्चा

आज सर्व पक्षीय नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून निषेध व्यक्त

प्रा. नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे : शिरूर - हवेलीचे आमदार ॲड. अशोक पवार यांच्या जिविताबद्दल निनावी पत्रात आक्षेपार्ह लिखाण केल्याच्या निषेधार्थ आज सर्व पक्षीय नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. येथील मारुती मंदिरापासून पोलीस दुरक्षेत्रपर्यंत सर्वपक्षीय मोर्चा काढून पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, बाजार समितीचे माजी उपसभापती विश्वास ढमढेरे व अनिल भुजबळ, पंचायत समितीच्या माजी सभापती आरती भुजबळ, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा विद्या भुजबळ, घोडगंगाचे संचालक पोपट भुजबळ व बाळासाहेब ढमढेरे, माजी सरपंच बाळासाहेब भुजबळ, सरपंच अंकिता भुजबळ, उपसरपंच नवनाथ ढमढेरे, बाजार समितीचे संचालक ऍड सुदीप गुंदेचा, ऍड. संपत ढमढेरे, रमेश भुजबळ, ऍड हर्षद भुजबळ, ऍड. सुरेश भुजबळ, माजी उपसरपंच विजय ढमढेरे, खरेदी विक्री संघाचे संचालक शहाजी ढमढेरे, संजय ढमढेरे, महेश भुजबळ, राकेश भुजबळ, मधुकर भूमकर, सुधाकर ढमढेरे तशेच राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, भाजप आदी पक्षांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी, काँग्रेसचे जिल्हा खजिनदार महेश ढमढेरे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष विद्या भुजबळ, माजी उपसरपंच बाळासाहेब ढमढेरे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संदीप ढमढेरे, शिवसेनेचे पिंटू मुळे, काँग्रेसचे सचिन पंडित, स्वप्निल शेलार आदींनी निनावी पत्राबद्दल संतप्त भावना व्यक्त करून गुन्हेगारांचा त्वरित शोध घ्यावा अशी मागणी केली.

यावेळी आमदार अशोक पवार व त्यांच्या कुटूंबाने तालुक्यासाठी केलेल्या सामाजिक कार्याचा व विकास कामांचा विशेष उल्लेख करण्यात आला. "निनावी पत्रादवारे समाजमन विचलित करू पाहणा-या, लोकप्रतिनिधींना धमकावणा-या, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बदनामी करणा-या प्रवृत्तीला शोधून कठोर शासन करावे अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करताना यापुढे असे प्रकार होणार नाहीत याची खबरदारी पोलिस प्रशासनाने घ्यावी अशी मागणी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नरके यांनी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT